IPL 2020 : अशक्‍य ते शक्‍य... पुरनची कहानी

शैलेश नागवेकर
Tuesday, 29 September 2020

पुरनचा हा प्रयत्न सर्वांनाच थक्क करणारा होता, कार अपघातात त्याच्या पायांची इतकी वाईट अवस्था झाली होती की तू पुन्हा क्रिकेट खेळू शकणार नाहीस असे डॉक्‍टरांना सांगितले होते.

शारजा : राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात रविवारी झालेला सामना आयपीएलला सर्वार्थाने वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा ठरला. सॅमसनप्रमाणे राहुल टिवेटिया हिरो ठरला, पण पराभूत संघाच्या निकोलस पुरनने सीमारेषेवर सुपरमॅन स्टाईल सूर मारून अडवलेला षटकार अद्‌भुततेचा आविष्कार दाखवणारा ठरला.

माझ्या क्रिकेट कारकिर्दीत मी अशा प्रकारचे चपळ क्षेत्ररक्षण पाहिले नव्हते, अशी शाबासकी दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकरने दिली. क्रिकेट जाणकार असो वा नसो, काल ज्यांनी ज्यांनी पुनरचे हे क्षेत्ररक्षण पाहिले त्या सर्वांनी पुनरला सलाम केला. 
 

विराटने केले पोलार्ड आणि ईशानचेही कौतूक

किती भयंकर होता अपघात

2015  तो प्रसंग वेस्ट इंडीजधील क्रिकेट अकादमीत सराव करून स्वतः गाडी चालवत तो परतत  असताना पूरनच्या गाडीला गंभीर अपघात झाला. त्याच्या पायावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मी पुन्हा खेळू शकणार की नाही, पुरन सतत डॉक्‍टरांना विचारत होता. मैदानावर यायला त्याला 18 महिने लागले.

असा अडवला षटकार

सॅमसनने मारलेला उंच फटका जो षटकारच होता. सीमारेषेच्या बराच बाहेर तो जात होता, पण तेथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या पुरनने जमिनीला काहीसेच अंतर समांतर अशी झेप मारली, चेंडू पकडला... क्षणार्धात तो जमिनीवर पडणार होता, पण तेवढ्यात त्याने चेंडू मैदानात फेकला.

IPL: संजू की पूरन कोणाचं क्षेत्ररक्षण भन्नाट; व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा?​

काय म्हणाले डॉक्‍टर
पुरनचा हा प्रयत्न सर्वांनाच थक्क करणारा होता, कार अपघातात त्याच्या पायांची इतकी वाईट अवस्था झाली होती की तू पुन्हा क्रिकेट खेळू शकणार नाहीस असे डॉक्‍टरांना सांगितले होते.


​ ​

संबंधित बातम्या