यू.एस ओपन मधून जागतिक टेनिसपटू एश्लीग बार्टीची माघार  

टीम ई-सकाळ
Thursday, 30 July 2020

यू.एस. ओपन पुढील ऑगस्ट महिन्याच्या अखेर पासून सुरु होणार आहे. मात्र जगातील पहिल्या क्रमांकाची महिला टेनिसपटू एश्लीग बार्टीने यू.एस ओपन मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.      

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्राचे वेळापत्रक चांगलेच कोलमडले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे मागील तीन ते चार महिन्यांपासून जगभरातील सर्वच खेळ स्पर्धांचे आयोजन रद्द अथवा पुढे ढकलण्याची नामुष्की विविध क्रीडा संघटनांवर ओढवली आहे. तर जगभरातील अनेक क्रीडा संघटनांनी कोरोनाच्या खबरदारीसाठी उपाययोजना आखत स्पर्धांना सुरवात केली आहे. टेनिस जगतातील चार महत्वाच्या ग्रँडस्लॅम पैकी एक असणारी यू.एस. ओपन पुढील ऑगस्ट महिन्याच्या अखेर पासून सुरु होणार आहे. मात्र जगातील पहिल्या क्रमांकाची महिला टेनिसपटू एश्लीग बार्टीने यू.एस ओपन मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.      

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

कोरोना विषाणूच्या संकटामुळे टेनिसमधील विम्बल्डनने यंदाची स्पर्धाच रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तर फ्रेंच ओपन पुढे ढकलण्यात आली असून,  27 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर च्या दरम्यान घेण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. तसेच यू.एस. ओपन 31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. परंतु जगातील अव्वल टेनिसपटू एश्लीग बार्टी हिने यू.एस. ओपन स्पर्धेत सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना साथीच्या काळात प्रवास करण्याची जोखीम असल्याचे कारण एश्लीग बार्टीने दिले असून, वेस्टर्न अँड सदर्न ओपन आणि अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत खेळणार नसल्याचे म्हटले आहे.   

`वदे भारत'द्वारे परदेशी कुस्ती कोच भारतात    

दरम्यान, अमेरिकेत 44 लाख 26 हजार 942 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, 1 लाख 50 हजार 716 जणांचा जीव गेला आहे. तर संपूर्ण जगभरात आत्तापर्यंत 1,60,76,713 नागरिकांना  कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. आणि 6 लाख 45  हजार 192 जणांचा मृत्यू झालेला आहे.

 


​ ​

संबंधित बातम्या