भारतात पुढच्या वर्षी होणार U-17 महिला फुटबॉल विश्वचषक 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 May 2020

याआधी फिफा 17 वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धा  या वर्षी दोन ते 21 नोहेंबर या कालवधीत होणार होत्या.

कोरोना व्हायरसमुळे जगभारात मागच्या दोन महिन्यांपासून क्रीडा आयोजने स्थगीत झाल्याने क्रीडा विश्वावर याचा गंभीर परिणाम झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे फिफा 17 वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन देखील रद्द करण्यात आले होते. पहिल्यांदाच होणाऱ्या या विश्वकप आयोजनाच्या नव्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. ही स्पर्धा पुढच्या वर्षी 17 फेब्रुवारी ते सात मार्च या कालावधी दरम्यान भारतात आयोजीत करण्यात येणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआईएफएफ) स्थानिक आयोजन समीतीकडून संबंधीत माहिती देण्यात आली आहे. 

 

 

याआधी फिफा 17 वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धा  या वर्षी दोन ते 21 नोहेंबर या कालवधीत होणार होत्या. भारतातील कोलकता, गुवाहटी, भुवनेश्वर, अहमदाबाद आणि नवी मुंबई या पाच वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजीत करण्यात आला आहे. फिफाकडून स्पर्धेचे वेळापत्रक बदलले असले तरी पात्रता मानंकन मात्र पहिलेच असतील असे सांगण्यात आले आहे. या स्पर्धेत जानेवारी 2003 नंतर आणि 31 डिसेंबर 2005 च्या अगोदर जन्मलेल्या खेळाडूंना सहभागी होता येणार आहे. या महिला विश्वचषकात भारतासमवेत आणखी 16 देशाचे संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धा भारतात होणार असल्याने भरातीय संघासाठी पात्रता मिळवण्याची अवश्यकता नसणार आहे, भारतीय संघाला या स्पर्धेत थेट संधी देण्यात येईल.
 


​ ​

संबंधित बातम्या