IND vs WI : अर्धशतकासह 'हिटमॅन'ने मोडला 22 वर्षांपूर्वीचा विक्रम!

वृत्तसंस्था
Sunday, 22 December 2019

विंडीजने भारतासमोर 316 धावांचे आव्हान उभे केले आहे. निकोलस पूरन आणि कर्णधार पोलार्ड यांनी अर्धशतकी खेळी करत विंडीजला 300 धावांचा पल्ला गाठून दिला.

कटक : भारताचा सलामीवीर फलंदाज आणि 'हिटमॅन' हे बिरुद अभिमानानं मिरवणाऱ्या रोहित शर्माने मैदानात येताच श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि तुफान फलंदाज सनथ जयसूर्याचा विक्रम मोडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

1997 साली म्हणजे 22 वर्षांपूर्वी जयसूर्याने सलामीवीर म्हणून एका कॅलेंडर वर्षात 2387 धावा काढल्या होत्या. हा विक्रम रोहितने मोडीत काढला आहे. 9 वी धाव पूर्ण केल्यानंतर नवा रेकॉर्ड रोहितच्या नावे जमा झाला आहे.

एका कॅलेंडर वर्षात 2400 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम आता रोहितच्या नावावर जमा झाला आहे. रोहित सध्या त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम फॉर्मात असून यावर्षी त्याने बऱ्याच विक्रमांची नोंद केली आहे. 

- INDvsWI : पूरन-पोलार्डच्या फटकेबाजीमुळे विंडीजची 315 पर्यंत मजल!

दरम्यान, विंडीजने भारतासमोर 316 धावांचे आव्हान उभे केले आहे. निकोलस पूरन आणि कर्णधार पोलार्ड यांनी अर्धशतकी खेळी करत विंडीजला 300 धावांचा पल्ला गाठून दिला. पूरनने 89 तर पोलार्डने नाबाद 73 धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना भारतीय सलामी जोडीने डावाची सावध सुरवात केली.  

- टीम इंडियासाठी तयार होतोय 'The Wall Jr'

मात्र, खेळपट्टीवर जम बसल्यानंतर रोहित आणि राहुलने आपले वैयक्तिक अर्धशतक साजरे केले. त्यानंतर रोहित आज शतक झळकावतो का काय? असे वाटत असतानाच होल्डरने 21 व्या षटकांत त्याची विकेट घेतली. आपल्या अर्धशतकी खेळीत रोहितने 63 चेंडूत 63 धावांची खेळी केली. यामध्ये 8 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

- Kai Po Che ते IPL : बघा दिग्विजय देशमुखचा स्वप्नवत प्रवास!

शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा भारताच्या 22 षटकांत 1 बाद 124 धावा झाल्या होत्या.


​ ​

संबंधित बातम्या