स्टोक्सला इंग्लंडचा कर्णधार होऊच देणार नाही : जेम्स अॅंडरसन

वृत्तसंस्था
Friday, 13 September 2019

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी आघाडी घेत आपले विजेतपद निश्चित केले. इंग्लंडच्या घरच्या मैदानावरील या परभवानंतर कर्णधार ज्यो रुटला लक्ष्य करण्यात आले आहे.

मॅंचेस्टर : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी आघाडी घेत आपले विजेतपद निश्चित केले. इंग्लंडच्या घरच्या मैदानावरील या परभवानंतर कर्णधार ज्यो रुटला लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे रुटला कर्णधारपदावरुन हटवावे आणि अष्टपैलू बेन स्टोक्सला कर्णधारपद द्यावे अशी मागणी जोर धरु लागली आहे.  मात्र, इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज याने मात्र, बेन स्टोक्सला एवढ्यात ही जबाबदारी देणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.  

''ऍशेस मालिकेत रुट आतापर्यंत तीन वेळा भोपळाही न फोडता बाद झाला. हा नक्कीच संघासाठी मोठी धक्का आहे कारण आण्ही त्याच्याकडे मोठी धावसंख्या करण्यासाठी आशेने पाहतो. त्याच्या कर्णधारपदबद्दल अनेक चर्चांना आता उधाण आले आहे. मात्र, माझ्यामते तो चांगली कामगिरी करत आहे. इंग्लंड क्रिकेटने गेल्या काही वर्षांमध्ये खूप अडचणींचा सामना केला आहे. विशेष म्हणजे अॅलिस्टर कूकच्या निवृत्तीनंतर सलामीवीर शोधण्यासाठी आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागले. मात्र, सध्या आम्ही योग्य दिशेने चाललो आहोत आणि रुटच आम्हाला योग्य कर्णधार आहे,'' अशा शब्दांत त्याने रुटचे कौतुक केले.  

बेन स्टोक्सबाबत बोलताना तो म्हणाला?,''
असेही त्याच्याशिवाय संघाचा कर्णधार होणार तरी कोण? बेन स्टोक्स? मात्र, तो उपकर्णधार म्हणूनच चांगला आहे. त्याला कर्णधारपद देण्याचा निर्णय आता तरी योग्य नाही.''

गेल्या 18 वर्षांत इंग्लंडने पहिल्यांदाच घरच्या मैदानावर झालेली ऍशेस मालिका गमावली आहे. गेल्यावर्षी सुद्धा इंग्लंडने रुटच्याच नेतृत्वाखाली खेळताना 4-0ने ऍशेस मालिका गमावली होती.  


​ ​

संबंधित बातम्या