विम्बल्डन स्पर्धेत समीर बॅनर्जी विजेता

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 July 2021

भारतीय वंशाच्या समीर बॅनर्जीने विम्बल्डन कुमार टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. अमेरिकेकडून खेळत असलेल्या बॅनर्जीने अमेरिकेच्याच व्हिक्टर लिलॉव याला दोन सेटच्या लढतीत पराजित करून बाजी मारली.

लंडन - भारतीय वंशाच्या समीर बॅनर्जीने विम्बल्डन कुमार टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. अमेरिकेकडून खेळत असलेल्या बॅनर्जीने अमेरिकेच्याच व्हिक्टर लिलॉव याला दोन सेटच्या लढतीत पराजित करून बाजी मारली.

न्यू जर्सीत राहणाऱ्या समीरने निर्णायक लढत ७-५, ६-३ बाजी मारली. सतरा वर्षीय समीरने अंतिम लढत १ तास २२ मिनिटांत जिंकली. अर्थात या विजयानंतर तो टेनिसमध्ये कारकीर्द करण्याची शक्यता कमी आहे. तो अर्थशास्त्र अथवा पॉलिटिकल सायन्समध्ये पदवी मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तो टेनिस तसेच अभ्यास या दोन्हीसाठी पोषक असलेल्या कोलंबिया विद्यापीठास प्राधान्य देण्याची शक्यता आहे. 

समीरने या स्पर्धेत आपला चांगलाच दबदबा निर्माण केला. त्याने या स्पर्धेत केवळ तीन सेट गमावले. त्याने या स्पर्धेत सलामीला १२ वा मानांकित मॅक्स कास्निकोवस्की याला पहिल्या फेरीत, तर पाचवा मानांकित पेद्रो बॉस्कार्डीन डायस याला उपांत्यपूर्व फेरीत हरविले होते. 

युकी भांब्री याने २००९ च्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत बाजी मारली होती, त्यानंतर भारतीय खेळाडूने प्रथमच ग्रँड स्लॅम स्पर्धेतील कुमार गटात बाजी मारली आहे. विम्बल्डनमध्ये भारतीय खेळाडूने १९९० नंतर बाजी मारली आहे. 

कोण आहे समीर

  • समीरचे वडील कुणाल मूळचे हैदराबादचे. ते ऐंशीच्या दशकापासून अमेरिकेत स्थायिक
  • अमेरिका विद्यापीठातील टेनिस स्पर्धांत खेळण्याचा फायदा
  • विद्यापीठ स्पर्धांत खेळून खेळ उंचावत असला तरी तो खेळत रहाणे खूपच महागडे, असे त्याच्या वडिलांचे मत
  • समीर फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीत गारद

​ ​

संबंधित बातम्या