'धमक असणारा गोलंदाज लाळेशिवायही आमचा चेंडू स्विंग करु शकेल'

टीम ई-सकाळ
Tuesday, 30 June 2020

इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातील ऐतिहासिक मालिकेतील सामन्यादरम्यान गोलंदाजांना चेंडूची चमक कायम ठेवण्यासाठी थूंकी/ लाळ याचा वापर करता येणार नसल्यामुळे गोलंदाज आणि क्रिकेटमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

क्रिकेटच्या मैदानात चेंडूची चमक कायम ठेवण्यासाठी थूंकीचा/ लाळेचा वापर करण्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने बंदी केली आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी क्रिकेटमध्ये लादलेल्या या निर्बंधांमुळे गोलंदाजांना चेंडू स्विंग करण्यात अडचण निर्माण होऊन फलंदाजांसाठी वातावरण अधिक अनुकूल बनेल, अशी चर्चा रंगू लागली.  मिचेल स्टार्कसारख्या गोलंदाजानेही आयसीसीचा नवा नियम गोलंदाजांना अडचणीत आणणारा असल्याचे म्हटले आहे. नवी चेंडूची चमक गेल्यानंतर फलंदाज सहज खेळणं शक्य होईल, असे मिचेल स्टार्कने म्हटले आहे. आयसीसीच्या नव्या नियमासंदर्भात अनेक चर्चा रंगल्या असल्या तरी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावातन सावरुन इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपासून या नियमाची अमंलबजावणी करण्यात येणार आहे. मार्चपासून स्थगित असलेल्या क्रिकेटला 8 जूलैपासून इंग्लंडच्या मैदानातून नव्याने सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी ड्यूक्सचा चेंडू वापरण्यात येणार आहे.

चेंडूला चमकवण्यासाठी आयसीसीने दुसरा पर्याय देणं गरजेचे : भुवी

इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातील ऐतिहासिक मालिकेतील सामन्यादरम्यान गोलंदाजांना चेंडूची चमक कायम ठेवण्यासाठी थूंकी/ लाळ याचा वापर करता येणार नसल्यामुळे गोलंदाज आणि क्रिकेटमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असले तरी या मालिकेत ज्या चेंडूचा वापर करण्यात येणार आहे त्या चेंडू तयार करणाऱ्या ब्रिटीश क्रिकेट बॉल्स लिमिटेडचे ​मालक दिलीप जाजोदिया यांना कोणतीच चिंता वाटत नाही. विशेष म्हणजे  क्रिकेटमधील चेंडूच्या गतीसंदर्भात  जाजोदियांशिवाय दुसरा कोणताही व्यक्ती उत्तम माहिती देऊ शकणार नाही. ड्युक्सच्या चेंडूवर खेळवण्यात येणाऱ्या ऐतिहासिक मालिकेत आयसीसीच्या नियमाचा चेंडूवर फारसा परिणाम होणार नाही. पूर्वीप्रमाणेच गोलंदाजी-फलंदाजीत  समतोल दिसेल, असा विश्वास दिलीप जाजोदिया यांनी व्यक्त केलाय.  

कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक षटकार लगावणारे खेळाडू माहित आहेत का? 

लंडनस्थित भारतीय वंशाच्या 72 वर्षीय दिलीप जाजोदिया यांनी स्पोर्ट जर्नलिस्ट संदिपान बॅनर्जी यांना दुरध्वनीच्या माध्यमातून दिलेल्या मुलाखतीमध्ये आयसीसीच्या निर्बंधासंदर्भातील मुद्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, लाळ वापरण्यावरील बंदी संदर्भात उमटणाऱ्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया वाचनात आल्या. सामन्यावर याचा संभावित प्रभाव होईल अशी चर्चा आहे. आमच्या ड्युक्स चेंडूवरयाचा फारसा परिणाम होणार नाही. चेंडू स्विंगसाठी चेंडूची चमक पर्याप्त नाही. चेंडूचा योग्य आकार, त्याची कठिणता, सीम आणि गोलंदाजाचे कौशल्य या गोष्टीही महत्त्वाच्या असतात, असे सांगत त्यांनी आयसीसीच्या नियमामुळे घाबरून जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

द्रविडच्या शब्दा-खातर सचिन-गांगुली जोडगोळीनं घेतली होती माघार

इंग्लंडमध्ये निर्माण करण्यात येणाऱ्या चेंडूची शिलाई उत्तमरित्या  करण्यात येते. गोलंदाजामध्ये स्विंग करण्याची क्षमता आहे तोपर्यंत चेंडू स्विंग होईल, याची खबरदारी आम्ही चेंडू तयार करताना घेतो. चेंडूमध्ये वापरण्यात येणाऱ्या चामड्याची गुणवत्ता उत्तम दर्जाची असून वाटरप्रुफिंग प्रयोजनाचा विचार करुन त्याला ग्रीस लावले जाते. त्यामुळे चेंडूला पँन्टवर घासले तरी चेंडूची चमक कायम ठेवणे शक्य होते. ज्यावेळी तुम्ही लाळ किंवा थुंकीचा वापर करता त्यावेळी ही प्रक्रिया जलद होते. सध्याच्या घडीला थुंकी किंवा लाळचा वापर न करता घामाचा वापरही खेळाडू चेंडू चमकवण्यासाठी करु शकतात, असा सल्लाही जाजोदिया यांनी दिला. घामाचा वापर करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.   


​ ​

संबंधित बातम्या