25 हजार कोटी कमवूनही बीसीसीआयच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ नाही

वृत्तसंस्था
Monday, 27 August 2018

बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघटना आहे. गेल्या आर्थिक वर्षात 25 हजार कोटी रुपये कमवूनही बीसीसीआयने आपल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिलेली नाही. बीसीसीआयमध्ये तब्बल 100 कर्मचारी कार्यरत आहेत. 

मुंबई : बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघटना आहे. गेल्या आर्थिक वर्षात 25 हजार कोटी रुपये कमवूनही बीसीसीआयने आपल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिलेली नाही. बीसीसीआयमध्ये तब्बल 100 कर्मचारी कार्यरत आहेत. 

बीसीसीआयच्या मुख्य कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या अंतर्गत वादांमुळे पगारवाढ थांबविण्यात आली आहे. आयपीएलचा कारभार पाहणारे काही कर्मचारी आणि स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहणारे कर्मचारी यांच्यात पगारवाढीसंदर्भात वाद सुरु आहे. आयपीएलचे काम पाहणारे कर्मचारी चौथ्या मजल्यावर बसतात तर उरलेले सर्व कर्मचारी दुसऱ्या मजल्यावर काम करतात. 

''आयपीएलचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याच्या बढतीमुळे बाकीच्या सर्व कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबविण्यात आली आहे. त्या एका कर्मचाऱ्याला मागील वर्षांच बढती दिल्यामुळे बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोगरी यांनी त्याच्या बढतीला नकार दिला आहे,'' असे बीसीसीआयमधील एका सूत्राने सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयाने नेमणूक केलेल्या प्रशासक समितीने या गोष्टीत लक्ष घालण्यास नकार दिल्याने हा विषय चिघळला असल्याचेही त्याने बीसीसीआयमधील सूत्रांनी स्पष्ट केले.  
  


​ ​

संबंधित बातम्या