एश्लीग बार्टीनंतर 'या' टेनिसपटूची यू.एस ओपन स्पर्धेतून माघार  

टीम ई-सकाळ
Sunday, 2 August 2020

जगातील पहिल्या क्रमांकाची महिला टेनिसपटू एश्लीग बार्टीने यू.एस ओपन मधून माघार घेण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला होता. त्यानंतर आता स्टार टेनिसपटू निक किरगिओसने देखील यू.एस ओपन स्पर्धेत खेळणार नसल्याचे म्हटले आहे.

जगातील पहिल्या क्रमांकाची महिला टेनिसपटू एश्लीग बार्टीने यू.एस ओपन मधून माघार घेण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला होता. त्यानंतर आता स्टार टेनिसपटू निक किरगिओसने देखील यू.एस ओपन स्पर्धेत खेळणार नसल्याचे म्हटले आहे. टेनिसपटू निक किरगिओसने कोरोनाच्या चिंतेमुळे आणि कोरोना विषाणूमुळे जीव गमावलेल्या शेकडो आणि हजारो अमेरिकन लोकांच्या सन्मानार्थ यूएस ओपनमधून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे.   

इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणतो, 'राहुल द्रविडच्या ई-मेलनं आयुष्याला कलाटणी मिळाली' 

कोरोनाच्या महामारीमुळे मागील तीन ते चार महिन्यांपासून जगभरातील सर्वच खेळ स्पर्धांचे आयोजन रद्द अथवा पुढे ढकलण्याची नामुष्की विविध क्रीडा संघटनांवर ओढवली आहे. तर जगभरातील काही क्रीडा संघटनांनी कोरोनाच्या खबरदारीसाठी उपाययोजना आखत स्पर्धांना सुरवात केली आहे. टेनिस जगतातील चार महत्वाच्या ग्रँडस्लॅम पैकी एक असणारी यू.एस. ओपन पुढील ऑगस्ट महिन्याच्या अखेर पासून सुरु होणार आहे. मात्र जगातील पहिल्या क्रमांकाची महिला टेनिसपटू एश्लीग बार्टीने यू.एस ओपन मधून माघार घेतल्यानंतर आता, टेनिसपटू निक किरगिओसने देखील यू.एस ओपन स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. निक किरगिओसने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये, कोरोनाच्या साथीमुळे उद्भवलेल्या सुरक्षा आणि आरोग्याच्या समस्येचे कारण देत आगामी यू.एस ओपन स्पर्धेतून माघार घेत असल्याचे म्हटले आहे. 

2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतलो असतो, मात्र...  

यापूर्वी, कोरोना साथीच्या काळात प्रवास करण्याची जोखीम असल्याचे कारण एश्लीग बार्टीने दिले होते. व वेस्टर्न अँड सदर्न ओपन आणि अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत खेळणार नसल्याचे एश्लीग बार्टीने म्हटले होते. तर चीनची अव्वल महिला टेनिसपटू वांग कियांगनेही अमेरिकेतील यू.एस. ओपन व अन्य स्पर्धेतून माघार घेतली असल्याचे जाहीर केले होते. कोरोना विषाणूच्या संकटामुळे टेनिसमधील विम्बल्डनने यंदाची स्पर्धाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर फ्रेंच ओपन पुढे ढकलण्यात आली असून,  27 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर च्या दरम्यान घेण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. तसेच यू.एस. ओपन 31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.            

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

दरम्यान, काल शनिवारी ब्रिटनचा खेळाडू माजी ऑलिम्पिक चॅम्पियन आणि तीन वेळा ग्रँड स्लॅम विजेता अ‍ॅन्डी मरेने, कोरोना साथीच्या धोक्याचा विचार करून इतर खेळाडू देखील यू.एस ओपन मधून माघार घेण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. स्पर्धेत खेळणे किंवा न खेळणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र जर काही खेळाडूंना सुरक्षित वाटत नसेल आणि प्रवास करुन स्वत: ला आणि त्यांच्या टीमला धोका पत्करायचा नसेल तर हे समजू शकते, असे अ‍ॅन्डी मरेने म्हटले होते. याशिवाय, अमेरिकेत आत्तापर्यंत 46 लाख 20 हजार 502 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, 1 लाख 54 हजार 449 जणांचा जीव गेला आहे. तर संपूर्ण जगभरात आत्तापर्यंत 1,78,59,763 नागरिकांना  कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. आणि 6 लाख 85 हजार 179 जणांचा मृत्यू झालेला आहे. 


​ ​

संबंधित बातम्या