न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिका अर्ध्यावरच कोरोनाने घेतली स्पर्धेची विकेट

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 March 2020

चॅपेल-हॅडली ही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशांत सुरू असलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका रद्द करण्यात आली आहे. या मालिकेतील दोन सामने खेळायचे बाकी होते. मात्र, कोरोनाच्या भीतीने ते दोन्ही सामने रद्द करण्यात आले.

सिडनीः चॅपेल-हॅडली ही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशांत सुरू असलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका रद्द करण्यात आली आहे. या मालिकेतील दोन सामने खेळायचे बाकी होते. मात्र, कोरोनाच्या भीतीने ते दोन्ही सामने रद्द करण्यात आले. न्यूझीलंड सरकारने परदेशी पाहुण्यांसाठी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. कोरोनामुळे परदेश प्रवासाचे नवे निर्बंध लागू होण्याआधी पाहुण्या संघाला मायदेशी परतण्याचे निर्देश दिले आहेत.

INDvsSA : कोरोनाची दहशतीमुळे IPL नंतर भारत-दक्षिण आफ्रिका मालिकाही रद्द!

या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर प्रेक्षकांविना झाला. सावधगिरीची उपाययोजना म्हणून वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या ‘कोरोना’च्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. अहवालानुसार त्यात कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत.

न्यूझीलंड सरकारने रविवारी मध्यरात्रीपासून परदेश प्रवासाचे निर्बंध लागू केले. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघटनेने न्यूझीलंड संघाला त्वरित मायदेशी जाण्यास सांगितले. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड क्रिकेट मंडळ भविष्यात द्विराष्ट्रीय मालिकेची योजना आखतील, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवेदनात म्हटले आहे.

मोठी बातमी : कोरोनामुळे IPL स्पर्धा पुढे ढकलली; 'या' तारखेला होणार...

इंग्लंडची श्रीलंकेतील मालिका आणि दक्षिण आफ्रिकेची भारतामधील मालिका स्थगित करण्यात आल्यानंतर चॅपेल-हॅडली चषक ही कोरोनामुळे स्थगित केलेली अखेरची क्रिकेट मालिका आहे.

कोरोनामुळे बीसीसीआयनेही सावध पाऊल उचलले आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी संपूर्ण जगभरातील खेळाडू सहभागी होतात. प्रेक्षकांचाही तसाच प्रतिसाद असतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या सामन्यांचीही मर्यादा कमी करण्याचे सूतोवाच बीसीसीआयचे सौरभ गांगुली यांनी सांगितले आहे. या अगोदरच ही स्पर्धा एप्रिलमध्ये ढकलली आहे.


​ ​

संबंधित बातम्या