श्रीलंकन चाहत्यांनी मैदानातच साजरा केला होता विलियम्सनचा B'day, व्हिडिओ व्हायरल 

सुशांत जाधव
Saturday, 8 August 2020

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन हा लोकप्रिय क्रिकेटर्स पैकी एक नाव. इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याच्या नेत्वाखालील न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला पराभूत करुन अंतिम फेरी गाठली होती. भारताला पराभूत करुन इंग्लंडविरुद्ध भिडणाऱ्या न्यूझीलंड संघाला तमाम भारतीय चाहत्यांनी प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले होते. क्रिकेटच्या इतिहासात झालेल्या अविस्मरणीय सामन्यात केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली संघाच्या पदरी पराभव आला असला तरी जगभरातील चाहत्यांनी विलियम्सनने मनं जिंकली होती. त्या केनचा आज वाढदविस.

जंटलमनच्या गेममधील गुणी खेळाडूंच्या यादीत अव्वलस्थानावर असणारा गडी कोण? या प्रश्नाला उत्तर देताना कोणी केन विलियम्सनच नाव घेतलं तर आश्चर्य अजिबात वाटणार नाही. न्यूझीलंडमध्येच नव्हे तर प्रत्येक संघाच्या क्रिकेट चाहत्यामध्ये केन विलियम्सनचा चाहता दिसून येतो. आज 30 व्या वाढदिवसाच्या दिवशी क्रिकेट जगतातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. यात मागील वर्षीच्या श्रीलंका दौऱ्यातील एक व्हिडिओ देखील व्हायरल होताना दिसतोय. 

8 ऑगस्ट 2019 मध्ये विलियम्सनने 29 वाढदिवस श्रीलंकेत साजरा केला होता. विशेष म्हणजे यावेळी श्रीलंकन क्रिकेट चाहत्यांनी त्याला केक भरवला होता. न्यूझीलंडचा संघ श्रीलंका बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन विरुद्ध तीन दिवसीय सामना खेळत असताना मैदानात एखाद्या दिग्गज क्रिकेटर्सचे बर्थडे सेलिब्रेशनचा क्षण अविस्मरणीय असाच होता.  
इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषकामध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामना सुपर ओव्हर्सनंतरही बरोबरीत सुटला होता. बाउंड्री काउंटच्या नियमानुसार, इंग्लंडला विजेता घोषीत करण्यात आले होते. या स्पर्धेत केन विलियम्सनला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. खरा विजेता केनचा संघ असल्याची भावनाही सोशल मीडियावर उमटल्याचे पाहायला मिळाले होते.

​ ​

संबंधित बातम्या