`या` दिग्गज खेळाडूला लागले आयपीएलचे वेध 

प्रीतम पुरोहित
Wednesday, 22 July 2020

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसन हा आयपीएल फ्रॅंचायझी सनरायझर्स हैदराबाद संघातील मुख्य खेळाडूंपैकी एक आहे.

वेलिंग्टन : न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसन हा आयपीएल फ्रॅंचायझी सनरायझर्स हैदराबाद संघातील मुख्य खेळाडूंपैकी एक आहे. आता आयपीएल 2020 चा कार्यक्रम जवळपास निश्‍चित झाला असल्याने सर्व खेळाडू आणि चाहते खूप आनंदी आहेत.

बीसीसीआयच्या आर्थिक पाठबळामुळेच हरभजन सिंगची 'त्या' प्रकरणातून सुटका 

केन विल्यमसन मात्र बीसीसीआयच्या घोषणेची आणि आयपीएलच्या तारखांच्या वेळापत्रकाची आतुरतेने वाट पाहत आहे. याआधी विल्यमसनने माउंट मौनगुनी येथील बे ओव्हल येथे पुन्हा प्रशिक्षण सुरू केले आहे. सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांना (बीसीसीआय) आयपीएलचे आयोजन करायचे आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. ही स्पर्धा खरोखरच जबरदस्त आहे, ही स्पर्धा आपल्यासारख्या प्रत्येकाला आकर्षित करते, विशेषत: प्रेक्षकांचा उत्साहही पाहण्यासारखा असतो, असे केन विल्यमसन म्हणाला. आम्ही सध्या परिस्थितीचा शोध घेत आहोत. आपण कुठे जात आहोत, आयपीएलमध्ये खेळणे नेहमीच एक आश्‍चर्यकारक गोष्ट असेल. कारण खेळणे किंवा त्याचा भाग होणे चांगले आहे. त्याच वेळी टी- 20 विश्वकरंडक तहकूब करण्यात आला, ही मोठी घटना होती, यात शंका नाही. व्यवस्थापनाने खेळाडू सुरक्षित असण्याला प्राधान्य दिले आहे, असे विल्यमसन म्हणाला.

आयसीसी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत बेन स्टोक्सची मुसंडी ; तर 'हे' भारतीय पहिल्या 5 मध्ये  

याव्यतिरिक्त आयपीएलची सुरुवात या वर्षी 29 मार्चपासून होणार होती; पण कोरोना विषाणूच्या साथीमुळे अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. विल्यमसनने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 41 सामने खेळले आहेत. त्याने 38.29 च्या सरासरीने 1,302 धावा केल्या आहेत.


​ ​

संबंधित बातम्या