व्वा मानलं तुला! एकही धाव न देता घेतले सहा बळी

वृत्तसंस्था
Tuesday, 3 December 2019

प्रथम फलंदाजी करणाऱ्या मालदीवचा डाव अवघ्या 16 धावांत आटोपला. नेपाळने हे आव्हान पाच चेंडूंतच पार केले. मालदीवचा डाव गुंडाळताना अंजलीने सातव्या षटकात तीन बळी मिळविले. त्यानंतर नवव्या षटकात तिने दोन आणि 11 व्या षटकात एक गडी बाद करताना मालदीवच्या डावाला पूर्णविराम दिला.

पोखरा : नेपाळची गोलंदाज अंजली चंद हिने सोमवारी टी-20 क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. मालदीवविरुद्धच्या सामन्यात तिने एकही धाव न देता सहा गडी बाद केले.

Happy Birthday Mithali Raj : महिला क्रिकेटला अच्छे दिन आणणारी साध्वी

प्रथम फलंदाजी करणाऱ्या मालदीवचा डाव अवघ्या 16 धावांत आटोपला. नेपाळने हे आव्हान पाच चेंडूंतच पार केले. मालदीवचा डाव गुंडाळताना अंजलीने सातव्या षटकात तीन बळी मिळविले. त्यानंतर नवव्या षटकात तिने दोन आणि 11 व्या षटकात एक गडी बाद करताना मालदीवच्या डावाला पूर्णविराम दिला. संपूर्ण सामन्यात मध्यमगती गोलंदाज अंजलीने केवळ 13 चेंडू टाकले.

महिला टी-20 क्रिकेटमधील यापूर्वीचा विक्रम मालदीवच्या मास एलिसा हिच्या नावावर होता. तिने याच वर्षी चीनविरुद्ध 3 धावांत 6 गडी बाद केले होते. पुरुषांच्या टी-20 क्रिकेटमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर याच्या नावावर हा विक्रम असून, त्याने गेल्याच महिन्यात बांगलादेशविरुद्ध सात धावांत सहा गडी बाद केले होते.


​ ​

संबंधित बातम्या