प्राप्ती किनरे, दुर्वांकूर चाळकेची ‘सुवर्ण’ भरारी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 February 2019

रत्नागिरी - औरंगाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय योगासन स्पर्धेत रत्नागिरीतील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या योगापटू प्राप्ती किनरेने दोन, तर दुर्वांकूर चाळकेने एक सुवर्णपदक पटकाविले.

रत्नागिरी - औरंगाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय योगासन स्पर्धेत रत्नागिरीतील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या योगापटू प्राप्ती किनरेने दोन, तर दुर्वांकूर चाळकेने एक सुवर्णपदक पटकाविले.

औरंगाबाद येथे झालेल्या ६४ व्या शालेय योगासन स्पर्धेत ३२ राज्यांतील ८९६  खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये १७ वयोगटातून रत्नागिरीच्या अभ्यंकर-कुलकर्णी ज्युनिअर कॉलेजचे दोन योगापटू सहभागी झाले. देशभरातील उत्कृष्ट योगापटूमध्ये रत्नागिरीतील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. प्राप्ती किनरेने योगासन प्रकारात आणि रिदमिक प्रकारात प्रत्येकी एक अशी दोन सुवर्णपदके तसेच दूर्वांकुर चाळकेने रिदमिक योगा प्रकारात एक सुवर्णपदक पटकावत रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

प्राप्ती किनरे आतापर्यंत पाच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये, तर दूर्वांकुरने तीन राष्ट्रीय स्पर्धांत खेळलेला आहे. या स्पर्धांचा अनुभव आणि आंतरराष्ट्रीय योगापटू पूर्वा किनरेचे मार्गदर्शन यामुळे या राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेत दोघांनी पदकांची कमाई केली. त्यांच्याबरोबर मार्गदर्शक म्हणून गेलेले प्राप्तीचे वडील शिवराम किनरे यांच्यासह महाविद्याचे क्रीडाशिक्षक, कर्मचारी आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी यांनी दोघींचे अभिनंदन केले. राष्ट्रीय शालेय स्पर्धेत एकतरी पदक कमविण्याची परंपरा यावर्षीही या द्वयींनी कायम राखली.


​ ​

संबंधित बातम्या