राष्ट्रीय पॅरा-ऍथलीट रस्त्यावर मागतोय भीक

वृत्तसंस्था
Monday, 3 September 2018

मनमोहनसिंह लोधी असे या ऍथलीटचे नाव आहे. त्याला जगण्यासाठी आता रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. तो भीक मागून जगत आहे. लोधीने 2017 च्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकले होते. त्याने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची अनेकवेळा भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण, एकदाही त्याला सरकारकडून प्रतिसाद देण्यात आला नाही.

भोपाळ : मध्य प्रदेश सरकारने दिलेले नोकरीचे आश्वासन न पाळल्याने एका राष्ट्रीय पॅरा-ऍथलीटला चक्क रस्त्यावर येऊन भीक मागण्याची वेळ आली आहे. 

मनमोहनसिंह लोधी असे या ऍथलीटचे नाव आहे. त्याला जगण्यासाठी आता रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. तो भीक मागून जगत आहे. लोधीने 2017 च्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकले होते. त्याने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची अनेकवेळा भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण, एकदाही त्याला सरकारकडून प्रतिसाद देण्यात आला नाही. सरकारने त्याला नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. लोधीने आतापर्यंत अनेक पदके मिळविलेली आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत त्याने 100 मीटर शर्यतीत ब्राँझ पदक पटकाविले होते. लोधीने 2009 मध्ये एक हात गमाविला होता.

लोधी म्हणाला, की मी आतापर्यंत मुख्यमंत्र्यांची चारवेळा भेट घेतली. त्यांनी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत. मी आर्थिकदृष्ट्या कुमकुवत असून, मला खेळण्यासाठी आणि घर चालविण्यासाठी पैसे हवेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी मदत नाकारली तर मी रस्त्यावर उतरून भीक मागणे कायम ठेवणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या