कोरोनाच्या भीतीने खेळांची राष्ट्रीय शिबिरे स्थगित

वृत्तसंस्था
Tuesday, 17 March 2020

कोरोनाच्या सावटामुळे देशभरातील विविध खेळातील नवोदित खेळाडूंसह गुणवंत खेळाडूही नाराज झाले आहेत. पहिल्या टप्प्यात सराव स्थगित होणे, स्पर्धा रद्द किंवा स्थगित होणे अशा घटना घडल्या आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. त्याचा परिणाम भारतातील विविध क्रीडा स्पर्धांच्या शिबीरावरही होत आहे. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा काही महिन्यांवर असताना विविध खेळांची राष्ट्रीय शिबिर तातडीने स्थगित करण्याचा निर्णय झाला आहे.

कोरोनामुळे क्रीडा स्पर्धांचा झाला खेळ

कोरोनाच्या सावटामुळे देशभरातील विविध खेळातील नवोदित खेळाडूंसह गुणवंत खेळाडूही नाराज झाले आहेत. पहिल्या टप्प्यात सराव स्थगित होणे, स्पर्धा रद्द किंवा स्थगित होणे अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे खेळाडूंनी अवसान न गाळता आपल्या सरावावर लक्ष केंद्रित करावे. या विश्रांतीदरम्यान खेळाडूंनी जोमाने सराव करून आगामी स्पर्धासाठी अधिक ताकदीने मैदानात उतरावे, असे आवाहन केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी केले आहे. 

INDvsSA : कोरोनाची दहशतीमुळे IPL नंतर भारत-दक्षिण आफ्रिका मालिकाही रद्द!

जगातील अनेक देशांमधील लोकांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे जवळपास सर्वच स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या स्पर्धा, सराव शिबीरे तसेच प्रशिक्षण सत्रे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. त्यामुळे खेळाडूंनी जिद्द न सोडता, नियमितपणे सराव करावा आणि पुढील स्पर्धासाठी सज्ज व्हावे,असे रिजिजू यांनी ट्विटरद्वारे देशातील खेळाडूंना आज (मंगळवार) संदेश दिला आहे. त्याचबरोबर सोमवारी (ता.16) रिजिजू यांनी त्यांचा (यापुर्वीचा स्वतः फुटबॉल खेळत) एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. 

ऑलंम्पिक होणार कि नाही ?

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) सर्व राष्ट्रीय संघटनांना स्पर्धाचे आयोजन न करता गर्दीचे प्रमाण टाळावे, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळेच इंडियन खुली बॅडमिंटन स्पर्धा, आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धा, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन एकदिवसीय क्रिकेट सामने रद्द करण्यात आले आहेत.


​ ​

संबंधित बातम्या