पर्यटनासाठी नव्हे, जिंकण्यासाठी चला! 

नरेश शेळके 
Tuesday, 10 September 2019

पात्रता गाठली म्हणजे तुमची निवड झाली, हे मनातून काढून टाका, असा संकेतच जणू भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने दोहा येथे होणाऱ्या जागतिक मैदानी स्पर्धेसाठी 25 सदस्यीय संघाची घोषणा करताना ऍथलिट्‌सना दिला. कारण पदक जिंकण्याचे दावेदार किंवा सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू हा विचार पुढे ठेवूनच खेळाडूंची निवड करण्यात आली. त्यामुळे नीरज चोप्रा, सुधा सिंग यांना वगळण्यात आले.

पात्रता गाठली म्हणजे तुमची निवड झाली, हे मनातून काढून टाका, असा संकेतच जणू भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने दोहा येथे होणाऱ्या जागतिक मैदानी स्पर्धेसाठी 25 सदस्यीय संघाची घोषणा करताना ऍथलिट्‌सना दिला. कारण पदक जिंकण्याचे दावेदार किंवा सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू हा विचार पुढे ठेवूनच खेळाडूंची निवड करण्यात आली. त्यामुळे नीरज चोप्रा, सुधा सिंग यांना वगळण्यात आले.

नीरज पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्याच्याविषयी जोखीम घेण्याचे धाडस महासंघाने केले नाही. कारण पुढील वर्षीची टोकियो ऑलिंपिक स्पर्धा रडारवर आहे. सुधा सिंग जानेवारी महिन्यात मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून पात्र ठरली असली, तरी त्यानंतर तिने मॅरेथॉनमध्ये भाग घेतला नाही. उलट ती स्टीपलचेस शर्यतीत सहभागी झाली. त्यामुळे तिची निवड निरर्थकच होती. या दोघांना वगळण्यात आले असले, तरी गुजरातची सरिताबेन गायकवाड, हरियानाची अंजली देवी यांची निवड का करण्यात आली नाही, याविषयी उलट-सुलट चर्चा सुरू आहे. सरिता गेल्यावर्षी जकार्तामध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या रिले संघात होती. त्याचप्रमाणे तिने यंदा दोहा येथेच झालेल्या आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेत चारशे मीटर हर्डल्स शर्यतीत ब्रांझपदक जिंकले. ती नियमितपणे राष्ट्रीय शिबिरातही आहे आणि रिले संघातील संभाव्य दावेदार होती. तरीही तिची निवड होऊ शकली नाही.

पी. टी. उषाची शिष्या जिस्ना मॅथ्यूसाठी सरिताचा बळी दिल्या गेला, अशी दबक्‍या आवाजात चर्चा आहे. कारण जकार्ताच्या वेळी जिस्नाची निवड झाली नव्हती. त्यावेळी उषाने नाराजी व्यक्त केली होती. कारण महिला 4-400 रिले संघासाठी हिमा दास, व्ही. के. विस्मया आणि अनुभवी पुवम्मा यांची निवड पक्की होती. चौथ्या स्थानासाठी चुरस होती. अंजली देवीने पात्रता गाठली असली, तरी तिने राष्ट्रीय शिबिरातून पळ काढल्याने तिला पुन्हा चाचणीला सामोरे जावे लागेल, हे निश्‍चित होते. तरीही सरिताची निवड होऊ शकली नाही, हे आश्‍चर्यकारक आहे. एका वरिष्ठ प्रशिक्षकाच्या मतावर विश्‍वास ठेवला, तर तिच्यावर उत्तेजकाचे संकट असावे, ही बाब मान्य करता येऊ शकेल. कारण तीन ज्युनिअर खेळाडूंना स्थान देताना सरिताला वगळावे, ही बाब निश्‍चितच खटकणारी आहे. 

हिमा दास आवडत्या चारशे मीटर शर्यतीसाठी पात्र ठरली नसली, तरी रिलेत ती उत्तम कामगिरी करेल. मिश्र रिले संघ पदकाच्या जवळपास पोहोचेल, असा विश्‍वास महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी व्यक्त केला आहे. पहिल्या आठमध्ये संघ आल्यास टोकियो ऑलिंपिकचे तिकीट पक्के होईल, हे माहीत असल्याने हिमाला फक्त रिले पळविण्याचा खटाटोप सुरू आहे, असे वाटते. विश्‍व विद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या द्युती चंदला पात्रता गाठता आली नसली तरी स्पर्धेसाठी शंभर मीटर शर्यतीसाठी निश्‍चित करण्यात आलेल्या खेळाडूंच्या संख्येत जागतिक मानांकनानुसार द्युतीला संधी आहे. त्यामुळे तिचा समावेश होऊ शकतो. 

भारतीय संघात अकरा ऍथलिट्‌स वैयक्तिक प्रकारात तर उर्वरित चौदा रिलेत सहभागी होणार आहेत. त्यापैकी जिन्सॉन जॉन्सन (पंधराशे मीटर), अविनाश साबळे (3000 स्टीपलचेस), एम. श्रीशंकर (लांब उडी) आणि नीरजच्या अनुपस्थितीत भालाफेकीची पताका फडकवीत ठेवणारा शिवपाल सिंग यांनी अंतिम फेरी गाठली किंवा पहिल्या आठमध्ये स्थान मिळविले तरी दोहा वारी सार्थकी लागली, असेच म्हणावे लागेल.


​ ​

संबंधित बातम्या