US Open : ओसाकाची लढणार 'आयडॉल' सेरेनाशी 

वृत्तसंस्था
Friday, 7 September 2018

न्यूयॉर्क : जपानच्या नाओमी ओसाका हिने कारकिर्दीमधील सर्वोत्तम कामगिरी करताना अमेरिकन ग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. विजेतेपदासाठी आता तिची गाठ अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सशी पडणार आहे. 

एखाद्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ओसाका जपानची पहिलीच टेनिसपटू ठरली. तिने गतवर्षीच्या उपविजेती मेडिसन किज हिचा 6-2, 6-4 असा पराभव केला. सेरेनाने लॅटवियाच्या ऍनास्तासिया सेवास्तोवा हिचे आव्हान तितक्‍याच सहजतेने 6-3, 6-0 असे मोडून काढले. 

उपांत्य लढतीत ओसाकाची सर्व्हिस खास झाली असे म्हणता येणार नाही. पण, तिने दाखवलेली लढाऊ वृत्ती निर्णायक ठरली. दोघींच्या खेळात हा मोठा फरक होता. मेडिसन हिने संपूर्ण लढतीत 13 ब्रेक पॉइंटच्या संधी मिळविल्या होत्या. मात्र, यापैकी एकही संधी तिला साधता आली नाही. ओसाकाने जशा या 13 संधी वाचवल्या, तशा मिळालेल्या चारपैकी तीन ब्रेकच्या संधी तिने साधल्या. 

ओसाकाने कारकिर्दीत पहिले विजेतेपद या वर्षी इंडियन वेल्स स्पर्धेत मिळविले. यापूर्वीच्या मेडिसनविरुद्धच्या तीन लढतीत ती हरली होती. या विजयाने ती प्रचंड उत्साहित झाली होती. 

सेरेनाने लॅटवियाच्या सेवास्तोवा हिला खेळ दाखविण्याची संधीच दिली नाही. अवघ्या 66 मिनिटांत तिने तिचा फडशा पाडला. सेरेनाने यापूर्वी 22 ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे मिळविली असून, येथे ती आठ वेळा विजेती ठरली आहे. सेरेना आज भलतीच आक्रमक होती. तिने नेटवर जवळपास 24 गुण मिळविले. त्याचबरोबर तिची सर्व्हिस ताशी 193 कि.मी. प्रतिवेगाने होत होती. तिच्या या आक्रमकतेला सेवास्तोवाकडे उत्तरच नव्हते. 5-3 अशा आघाडीनंतर सेरेनाने सलग सात गेम जिंकून अंतिम फेरीच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. 

ही कामगिरी खूप विलक्षण आहे. यापूर्वी कधीच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची अंतिम लढत खेळले नव्हते. सेरेनाविरुद्ध खेळायची खूप इच्छा होती. ती अशा पद्धतीने पूर्ण होणार आहे. 
- नाओमी ओसाका, जपानची टेनिसपटू 

​ ​

संबंधित बातम्या