नाओमीचा 'आयडॉल' सेरेनावर टीका करण्यास नकार 

वृत्तसंस्था
Thursday, 13 September 2018

"रोल मॉडेल'... 
नाओमी या यशामुळे "रोलमॉडेल' बनली आहे. याबद्दल विचारले असता, ती मिस्कीलपणे म्हणाली, ""केई निशीकोरी हा सुपर रोलमॉडेल आहे, असे मला नेहमी वाटायचे आणि आपणही तसे बनण्याची आशा होती, पण माझ्याकडे त्यादृष्टीने बघू नका, कारण मला ती जबाबदारी नको आहे!'' 

टोकियो : पंचांना "चोर' म्हणून माफी मागण्यास दडपण आणलेल्या आणि मुळात "आयडॉल' असलेल्या सेरेना विल्यम्सविषयी कोणत्याही प्रकारे नाराजीची भावना नाही. अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यादरम्यान जे काही घडले त्याबद्दल वाईट वाटत नाही, असे जपानची टेनिसपटू नाओमी ओसाका हिने सांगितले. 

नाओमीने वयाच्या 20व्या वर्षी मिळविलेल्या पहिल्यावहिल्या ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाचा पराक्रम सेरेनाच्या वादग्रस्त वर्तनामुळे झाकोळला गेला. यामुळे काही माजी खेळाडू आणि तज्ज्ञांनी सेरेनावर टीका केली आहे, तर काही जणांनी पाठिंबा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर नाओमीने प्रथमच जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केली. 

जपानमध्ये आगमन झाल्यानंतर तिने सांगितले, की मुळात वाईट वाटून घ्यायचे असेल, तर ते कसे हेच मला माहीत नाही. वाईट वाटून घेण्याचा विचारही मनाला शिवला नाही, कारण ग्रॅंड स्लॅम अंतिम सामन्याचा दुसरा कुठला अनुभव मला नाही. अजिबात खेद करायचचा नाही इतकेच मला वाटले. माझी एकूण भावना आनंदाची होती. मी खूप काही साध्य केल्याची कल्पना आहे.' 

"रोल मॉडेल'... 
नाओमी या यशामुळे "रोलमॉडेल' बनली आहे. याबद्दल विचारले असता, ती मिस्कीलपणे म्हणाली, ""केई निशीकोरी हा सुपर रोलमॉडेल आहे, असे मला नेहमी वाटायचे आणि आपणही तसे बनण्याची आशा होती, पण माझ्याकडे त्यादृष्टीने बघू नका, कारण मला ती जबाबदारी नको आहे!'' 

किमीकोची प्रतिक्रिया 
जपानची एक काळ लक्षवेधी कामगिरी केलेली किमीको डाटे हिने सांगितले, की अंतिम सामना जिंकल्यानंतर नाओमीला रडू कोसळले. यशाच्या परमोच्च क्षणाचा तिला आनंद लुटता आला नाही. नाओमी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवू शकते, असे भाकीतही तिने वर्तविले. 

"मिशन टोकियो' 
नाओमी यानंतर टोकियोतील पॅन पॅसिफिक ओपन स्पर्धेत खेळणार आहे. यंदाच्या मोसमात जागतिक क्रमवारीत पहिल्या पाच जणींत स्थान मिळविण्याचे तिचे ध्येय आहे. 2020च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे तिचे ध्येय आहे.


​ ​

संबंधित बातम्या