US Open : नदालच्या माघारीने जुआन मार्टीन डेल पोट्रो अंतिम फेरीत

वृत्तसंस्था
Saturday, 8 September 2018

न्यूयॉर्क : रॅफेल नदाल आणि जुआन मार्टीन डेल पोट्रो यांच्यात झालेल्या उपांत्य सामन्यातून नदालने दुखापतीमुळे माघार घेतली. त्यामुळेच अर्जेंटीनाचा मार्टीनने अमेरिकन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. 

नदाल आणि मार्टीन यांच्या सामन्यात दुसरा सेट सुरु असताना नदालच्या गुडघ्याला असह्य वेदना होऊ लागल्या. त्यामुळेच त्याने सामन्यातून माघार घेतली. तत्पूर्वी मार्टीनने पहिला सेट 7-6 (7/3) असा जिंकला होता तर दुसऱ्या सेटमध्येही तो 6-2 असा आघाडीवर होता. त्यानंतर मात्र नदालने सामन्यातील माघार घेण्याचा निर्णय घेतला. 

जागतिक क्रमावारीत पहिल्या स्थानावर असलेल्या स्पेनच्या नदालला सामना सुरु असतानाच दोन वेळा वैद्यकीय उपचारांची गरज भासली. ''वेदनांसह खेळत राहणे माझ्यासाठी अशक्य होते, मला असह्य वेदना होत होत्या आणि माझ्यासाठी हा टेनिस सामना उरलाच नव्हता. या सामन्यात फक्त एकच खेळाडू खेळत होता आणि मी फक्त कोर्टच्या एका बाजूला उभा होतो. माघार घेणे मला अजिबात पसंत नाही परंतू सामना खेळण्याची माझ्यात ताकद नाही,'' असे स्पष्टीकरण नदालने सामन्यानंतर दिले. 

Image may contain: 3 people, people playing sports

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या मार्टीनने 2009 मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धेचे विजेतपद पटकावले होते. अंतिम फेरीत त्याची लढत आता सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचशी आहे. जोकोविचने जपानच्या कि निशिकोरीला 6-3, 6-4, 6-2 असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

​ ​

संबंधित बातम्या