प्रेमात हरलेल्या चाहत्याला भुवीने दिला मोलाचा सल्ला

टीम ई-सकाळ
Monday, 29 June 2020

भुवीला एका चाहत्याने चक्क त्याच्या खासगी आयुष्यातील प्रश्न सांगत सल्ला मागितल्याचे पाहायला मिळाले. त्या चाहत्याला भुवीने दिलेल्या उत्तराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.  

क्रिकेटच्या मैदानात शांतता असताना संघातील खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत आहेत. यात सलामीवीर रोहित शर्मा आघाडीवर असला तरी भुवीही मागे नाही. भुवी देखील सोशल मीडियावरील लाइव्हचा पूरेपूर फायदा घेताना दिसत आहे. नुकताच भुवीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दर्शन दिले. यावेळी त्याने चाहत्यांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिले. विशेष म्हणजे यावेळी भुवीला एका चाहत्याने चक्क त्याच्या खासगी आयुष्यातील प्रश्न सांगत सल्ला मागितल्याचे पाहायला मिळाले. त्या चाहत्याला भुवीने दिलेल्या उत्तराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.  

क्रिकेटच्या मैदानातील 'हे' लाजिरवाणे रेकॉर्ड तुम्हाला माहित आहेत का?

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने 'कोई सवाल है' या सेशनच्या माध्यमातून इन्टाग्राम लाइव्ह आला होता. यावेळी एका चाहत्याने आपल्या प्रेमाची कहाणी सांगत पुढे काय करायचं सूचत नाही, असा प्रश्न उपस्थितीत केला. प्रेमामुळे निराशेच्या गर्तेत अडकलेल्या चाहत्याने भुवीला प्रश्न केला की,   माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न ठरलं आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. या परिस्थितीत काय करायचे मला सूचत नाही. आपल्या चाहत्याचा या प्रश्नाला भुवीने धीर देण्याचे काम केले. भुवीने त्ययाला दिलेल्या रिप्लायची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होतना दिसत आहे. धीर सोडू नकोस. स्वत:ला मजबूत कर आणि हसतमूख रहा! अशा शब्दात भुवीने त्याला प्रेमातून सावरण्याचा सल्ला दिल्याचे पाहायला मिळाले.  

बीसीसीआयला विस्मरण झाले की काय? कधी होणार विवोची गच्छंती...

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मार्चपासून क्रिकेटची मैदाने ओस पडली आहेत. कोरोनामुळे भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मालिका न खेळता मायदेशी परतण्याची वेळ आली होती. वेस्ट इंडिज, पाकिस्तान संघ इंग्लंडमध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज असताना भारतीय संघाबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. भारतीय संघातील काही मोजक्या खेळाडूंनी वैयक्तिक सराव सुरु केला असला तरी ऑगस्टपूर्वी भारतीय संघाचे एकत्रित सराव शिबीर शक्य नसल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या