इंग्लंड व भारतास त्यांच्याच मायभूमीत हरवणे माझे स्वप्न - स्टीव्ह स्मिथ 

टीम ई-सकाळ
Wednesday, 5 August 2020

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील फलंदाज स्टीव्ह स्मिथला आपली क्रिकेट मधील कारकीर्द संपण्यापूर्वी इंग्लंड संघाला त्यांच्याच मायभूमीत अ‍ॅशेस मालिकेत पराभूत करायचे आहे. यासोबतच टीम इंडियाला देखील भारतातच कसोटी मालिकेत हरवण्याची इच्छा पूर्ण करायचे असल्याचे स्टीव्ह स्मिथने म्हटले आहे. 

क्रिकेट जगतात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात ज्याप्रमाणे कडवी झुंझ पाहायला मिळते, त्याप्रमाणेच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेमध्ये मोठी टक्कर पाहायला मिळते. त्यामुळेच ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील फलंदाज स्टीव्ह स्मिथला आपली क्रिकेट मधील कारकीर्द संपण्यापूर्वी इंग्लंड संघाला त्यांच्याच मायभूमीत अ‍ॅशेस मालिकेत पराभूत करायचे आहे. यासोबतच टीम इंडियाला देखील भारतातच कसोटी मालिकेत हरवण्याची इच्छा पूर्ण करायचे असल्याचे स्टीव्ह स्मिथने म्हटले आहे. 

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या स्टीव्ह स्मिथने क्रिकेट मधील आपली कारकीर्द संपण्यापूर्वी दोन स्वप्ने साकार करायची असल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने एका मुलाखती दरम्यान, इंग्लंड संघाला अ‍ॅशेस मालिकेत आणि विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाला कसोटीत त्यांच्याच मायभूमीत नमवायचे असल्याचे सांगितले. वय वाढत असल्यामुळे अजून किती काळ क्रिकेट खेळेन आणि भविष्यात काय होईल याबाबत माहित नाही. मात्र ही दोन ध्येय कायम निश्चित राहणार असल्याचे स्टीव्ह स्मिथने यावेळेस सांगितले. त्यामुळे  इंग्लंड आणि भारताला पराभूत करणे म्हणजे पर्वत पार केल्याप्रमाणेच असून, ही कामगिरी फत्ते केल्यास विशेष ठरणार असल्याचे स्मिथने म्हटले आहे. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौर्‍यावर येणार आहे.      

2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतलो असतो, मात्र...      

मागील वर्षी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाने 2 - 2 च्या अंकाने अ‍ॅशेस मालिका बरोबरीत सोडवली होती. मात्र ओवल येथील अंतिम कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पत्कराव लागलेला पराभव आज देखील खटकत असल्याचे स्टीव्ह स्मिथने या मुलाखतीत सांगितले. अ‍ॅशेस बरोबरीत राखणे चांगले होते परंतु त्यातून विजयाचे समाधान मिळाले नसल्याचे स्मिथ म्हणाला. त्यामुळे वैयक्तिक दृष्टीकोनातून अजून काम पूर्ण झालेले नसल्याचे स्टीव्ह स्मिथने म्हटले आहे.    

इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणतो, 'राहुल द्रविडच्या ई-मेलनं आयुष्याला कलाटणी मिळाली' 

अ‍ॅशेस मालिके दरम्यान, इंग्लंड विरुद्धच्या चारही कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथने दमदार फलंदाजी करत, 110.57 च्या सरासरीने 774 धावा केल्या होत्या. तर 2017 मध्ये भारतात झालेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला 1 - 2 ने पराभवास सामोरे जावे लागले होते. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला 2 सामने जिंकत धूळ चारली होती. या मालिकेत देखील स्टीव्ह स्मिथने तीन शतके झळकावली होती.                       


​ ​

संबंधित बातम्या