दुखापत झाली तरी फलंदाजी कशी करायची विसरलेलो नाही; बघा कोण म्हणतंय

वृत्तसंस्था
Tuesday, 24 December 2019

गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला वेस्टइंडिजविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागले होते. त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आता धवनला मोठी खेळी करणे गरजेचे आहे. ​

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी20 मालिकेत पुनरागमन करणाऱ्या शिखर धवनने दुखापत झाली तरी फलंदाजी कशी करायची विसरलेलो नाही असे म्हणत जोरदार पुनरागमन करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे शिखर धवन बरेच दिवस संघातून बाहेर होता. पुनरागमनाबद्दल बोलताना तो म्हणाला, ''दुखापती नैसर्गिक असतात त्यामुळे त्यांचा स्वीकार करावा लागत. संघात आत-बाहेर केल्याने माझ्या खेळावर काहीही परिणाम होत नाही कारण मी फलंदाजी कशी करायची विसरलेलो नाही. मी माझ्या लौकिकाला साजेशी कामगिरी करुन नक्कीच जास्त धावा करेल.''

भारताला मोठा धक्का! आता 'हा' खेळाडू एप्रिलपर्यंत संघाबाहेर

गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला वेस्टइंडिजविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागले होते. त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आता धवनला मोठी खेळी करणे गरजेचे आहे. तो आता पूर्ण तंदुरुस्त असल्याने त्याची श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकांसाठी निवड झाली आहे. 


​ ​

संबंधित बातम्या