IPL 2019 : हुश्श! मुंबई एकदाची जिंकली; धोनीची 'डॅडी आर्मी' प्रथमच हारली!

शैलेश नागवेकर
Thursday, 4 April 2019

आयपीएल 2019:  मुंबई : अडखळत-लडखत पुढे सरकणाऱ्या डावाला अखेरच्या दोन षटकांत हार्दिंक पंड्या आणि पोलार्डच्या अतिशय स्फोटक फलंदाजीचे (45 धावा)  मिळालेले टॉनिक आणि त्यानंतर गोलंदाजीतील देखणी कमगिरी यामुळे मुंबई इंडियन्सने गतविजेत्या चेन्नईचा तीन लढतींचा विजय रथ रोखला 37 धावांनी विजय साकारत स्वतःच्या आयपीएल आव्हानाला नवे बळ दिले.

आयपीएल 2019:  मुंबई : अडखळत-लडखत पुढे सरकणाऱ्या डावाला अखेरच्या दोन षटकांत हार्दिंक पंड्या आणि पोलार्डच्या अतिशय स्फोटक फलंदाजीचे (45 धावा)  मिळालेले टॉनिक आणि त्यानंतर गोलंदाजीतील देखणी कमगिरी यामुळे मुंबई इंडियन्सने गतविजेत्या चेन्नईचा तीन लढतींचा विजय रथ रोखला 37 धावांनी विजय साकारत स्वतःच्या आयपीएल आव्हानाला नवे बळ दिले.

वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना कमालीचा उत्कंठावर्धक होता. प्रथम फलंदाजी करणारा मुंबई संघ 18 षटकांत 5 बाद 125 आणि 20 व्या षटकाअखेर 5 बाद 170 अशा सुद्धृड अवस्थेत आला. येथेच खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी सामना सुरु झाला होता. त्यानंतर  बेहरँडॉफ, मलिंगा, हार्दिक पंड्या यांच्या गोलंदाजीने चेन्ऩई फलंदाजीच्या मुसक्या आवळल्या. केदार जाधव एकटा लढला पण त्याचा अर्धशतकी प्रतिकार पुरेसा ठरला नाही.  

दोन्ही संघांची सुरुवात जवळपास सारखी म्हमजे अडखळती होती. पहिलाच सामना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या बेहरँडॉफचा उसळता चेंडू रायडूला समजलाच नाही पुढच्या षटकांत मलिंगाने वॉटसनला चकवले. त्यानंतर सुरेश रैनाने तीन आक्रमक फटके मारून दबाव झुगारला. पण सीमारेषेवर त्याला त्याचा पोलार्डने एका हातात जबरदस्त आणि थरारक झेल पकडला त्यावेळी चेन्नईची 3 बाद 33 अशी अवस्था झाली होती.

केदार जाधव आणि माही...माही अशा गजरात मैदानात आलेल्या महेंद्रसिंग धोनी यांना परिस्थितीनुसार सावधच पवित्रा घ्यावा लागला तरिही केदारने बुमराच्या पहिल्या षटकांत 15 धावा काढून शर्यत कायम ठेवली होती.
परंतु कधी तरी या दोघांना गिअर बदलावे लागणार होते. 15 व्या षटकांत जेव्हा 30 चेंडूत 84 धावांची गरज असताना हार्दिकला टार्गेट करण्याचा धोनीचा प्रयत्न फसला. याच षटकांत जडेजाही बाद झाला.

पंड्या-पोलार्डचा तडाखा

डिकॉकप्रमाणे रोहित शर्माही धडपडत संपल्यानंतर युवराज परतला तेव्हा मुंबईची अवस्था 3 बाद 50 अशी झाली होती. फॉर्मात नसलेल्या पोलार्डऐवजी कृणाल पंड्याला बढती देण्यात आली त्याने अधून मधून प्रयत्न केले तरिही चेन्नईच्या गोलंदाजांची बंधने पूर्णपणे झुगारता येत नव्हती. अखेर सूर्यकुमारसह त्याची 62 धावांची भागी 17 व्या षटकांत संपुष्टात आली.  त्यानंतर अखेरच्या दोन षटकांत हार्दिक आणि पोलार्ड यांनी 45 धावा कुटल्या.
 
संक्षिप्त धावफलक : मुंबई : 20 षटकांत 5 बाद 170 (सूर्यकुमार यादव कृणाल पंड्या 42 -32 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, हर्दिक पंड्या 25 -8 चेंडू, 1 चौकार, 3 षटकार, पोलार्ड 17 -7 चौकार, 2 षटकार, दिपक चहर 21-1, इम्रान ताहिर 25-1, रवींद्र जडेजा  10-1)
चेन्नई : 20 षटकांत 8 बाद 133 (सुरेश रैना 16 -15 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, केदार जाधव 58 -54 चेंडू, 8 चौकार, 1 षटकार, बेहरँडॉफ 22-2, मलिंगा 34-3, हार्दिक पंड्या 20-3)

संबंधित बातम्या