'डॅडी का लाडला! मुंबई इंडियन्सने शेअर केला 'ज्यूनिअर पांड्या'चा फोटो

सुशांत जाधव
Saturday, 1 August 2020

31 मे 2020 मध्ये सर्बियन नर्तिका आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पांड्या यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पालक होणार असल्याची माहिती दिली होती.

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या 'बाप माणूस' झाल्याने चांगलाच चर्चेत आहे. पांड्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत  मुलगा झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. या फोटोमध्ये तो चिमकल्या प्रिन्सचा हात हातात घेतल्याचे दिसले होते. त्याने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया उमटल्याच्या पाहायला मिळाले. क्रिकेटर्स आणि अन्य नेटकऱ्यांनी हार्दिक-नताशा जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला.  त्यानंतर आता मुंबई इंडियन्सनेही त्यांच्या अधिकृत इन्स्टा अकाउंटवरुन हार्दिक पांड्याचा एक फोटो शेअर केलाय. यात पांड्या आपल्या मुलाला घेऊन उभा असल्याचे दिसते. 'डॅडीचा लाडला' या आशयाचं कॅप्शनसह हा फोटो शेअर करण्यात आला आहे. हार्दिक पांड्याने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलाय.  

https://www.instagram.com/p/CDVaPIjsmu3/?utm_source=ig_web_copy_link

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

31 मे 2020 मध्ये सर्बियन नर्तिका आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पांड्या यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पालक होणार असल्याची माहिती दिली होती. यावर्षीच्या सुरुवातीलाच हार्दिक आणि नताशा यांनी एकत्र येण्याची घोषणा केली होती. हार्दिकने दुबईमध्ये रोमॅण्टिंक अंदाजात नताशाला प्रपोज केल्याचे पाहायला मिळाले होते. 1 जानेवारी 2020 रोजी नव्या वर्षांच्या मुहूर्तावर दोघांनी ऐकमेकांच्या प्रेमाची कबूली दिली. कोरोनामुळे देशात लॉकडाउनची परिस्थिती असतानाच दोघांनी कुटुंबियांच्या साक्षीनं विवाह देखील आटोपला होता. 

फिफा झाली मेहरबान ; 211 देशांना देणार आर्थिक सहाय्य

पाठदुखीमुळे हार्दिक पांड्या बरेच दिवस भारतीय संघाबाहेर होता. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतून भारतीय संघात कमबॅक केले. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा भारत दौरा सामना खेळवण्याशिवायच आटोपण्याची वेळ आली. पहिला सामन्यातील पावसाच्या अडथळ्यानंतर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला दौऱ्यावरुन माघारी फिरण्याची नामुष्की ओढावली होती. युएईत होणऱ्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून पांड्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.


​ ​

संबंधित बातम्या