IPL 2019 : विक्रमवीर अलझारीऐवजी आफ्रिकेचा 'हा' खेळाडू मुंबईच्या संघात 

वृत्तसंस्था
Tuesday, 23 April 2019

आयपीएल 2019 : मुंबई : मुळात बदली खेळाडू म्हणून संघात आलेला जोसेफ अलझारीही दुखापतग्रस्त झाल्यामळे मुंबई इंडियन्सने त्याच्या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज ब्युरन हेन्रिक्‍स याची निवड केली आहे. मुंबईच्या शुक्रवारी चेन्नईविरूद्ध होणाऱ्या सामन्यासाठी तो उपलबद्ध असेल. 

ऍडम मिल्ने आयपीएल सुरु होण्यापूर्वीच जखमी झाल्यामुळे त्याच्याऐवजी वेस्ट इंडीजच्या अलझारीची निवड मुंबईने केली होती. पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात त्याने 12 धावांत 6 विकेट अशी आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी केली होती, परंतु एका सामन्यात सीमारेषेवरील चेंडू अडवताना त्याचा खांदा दुखावला त्यामुळे त्याला आयपीएलमधून माघार घ्यावी लागली होती. 

ब्युरन हेन्रिक्‍स या अगोदर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून 2014 -15 मध्ये आयपीएल खेळला आहे. सात सामन्यात मिळून त्याने नऊ विकेट मिळवल्या आहेत. दिल्लीसंघाविरूद्धच्या सलामीच्या सामन्यात त्याने 36 धावांत 3 विकेट अशी कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेकडून तो दोन एकदिवसीय आणि 10 ट्‌वेन्टी-20 सामने खेळलेला आहे.  

​ ​

संबंधित बातम्या