मुंबईचा गोलफादेवी कबड्डी चषकाचा मानकरी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 February 2019

कुडाळ - आमदार वैभव नाईक राज्यस्तरीय कबड्डी चषकाचा मानकरी मुंबईचा गोलफादेवी ठरला. अंतिम सामन्याचे उपविजेतेपद न्यू हिंद रत्नागिरी यांनी मिळवले. हा सामना एकतर्फी झाला. अष्टपैलू खेळाडूचा मानकरी न्यू हिंद रत्नागिरीचा कुलभूषण कुलकर्णी ठरला.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने तहसीलदार कार्यालय नजीकच्या क्रीडा संकुलावर या स्पर्धा झाल्या. युवासेना कुडाळ व युवक कल्याण संघ कणकवली यांच्यावतीने पाचव्या आमदार वैभव नाईक राज्यस्तरीय चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते.  

काल (ता.10) रात्री समारोप झाला. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी उपउपांत्य फेरीत एक चार सामने झाले. उपांत्य फेरीचा सामना न्यू हिंद रत्नागिरी व गुढीपुर पिंगुळी यांच्यात झाला. दुसरा सामना गोलफादेवी मुंबई विरुद्ध अमर भारत मुंबई यांच्यात झाला. हे दोन्ही सामने एकतर्फी झाले. पिंगुळी गुढीपुर संघ मातब्बर अशा रत्नागिरी संघाशी भिडला.

अतिशय चुरशीची झुंज दिली; मात्र त्या बलाढ्य संघापुढे 44-35 गुणांवर पराभवाला सामोरे जावे लागले. गोल्पा देवीने 33-22 असे गुण मिळवीत उपांत्य फेरी गाठली. अंतिम फेरीचा सामना गोलफादेवी मुंबई विरुद्ध न्यू हिंद रत्नागिरी यांच्यात झाला. शेवटचा सामना अटीतटीचा होईल, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमीतून व्यक्त होत होती; मात्र हा सामना एकतर्फी झाला. अंतिम सामन्याची नाणेफेक आमदार वैभव नाईक व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली. सुरूवातीपासून हा सामना मुंबईच्या बाजूने झुकलेला दिसत होता.

रत्नागिरी संघाला या गोलफादेवी समोर आपले उद्दिष्ट साध्य करता आले नाही. मध्यंतरला हा सामना एकतर्फीच होता तो अंतिम क्षणी एकतर्फीच राहिला. गोल्पादेवीने 31 गुण तर रत्नगिरीने 12 गुण मिळविले. गोलफादेवीने 19 गुणांनी रत्नागिरी वर एकतर्फी विजय मिळवीत. आमदार वैभव नाईक चषकाचा मानकरी ठरला. तृतीय अमर भारत मुंबई, चतुर्थ पिंगुळी गुढीपुर ठरला. विजेत्या गोलफादेवी मुंबई संघाला 51 हजार व चषक, उपविजेत्या रत्नागिरीला 31 हजार व चषक, उपांत्य फेरीतील पराभूत दोन्ही संघाना प्रत्येकी 11 हजार व चषक देण्यात आला.

अष्टपैलू खेळाडू म्हणून राष्ट्रीय खेळाडू कुलभूषण कुलकर्णी रत्नागिरी यांची निवड झाली. उत्कृष्ट चढाईसाठी सिद्धेश पिंगळे गोलफादेवी मुंबई, उत्कृष्ट पकड कल्पेश कडू गोल्पादेवी मुंबई यांची निवड झाली.

संबंधित बातम्या