कोहलीने घातला कुर्ता 'मान्यवर', अनुष्का असूनही बनला उपवर?

मुकुंद पोतदार
Wednesday, 11 September 2019

खेळपट्टीवर उतरल्यानंतर स्टान्स घेताच शैलीदार शॉट मारणारा किंग कोहली अर्थात विराट तसे पाहिले तर फॅशनेबल फलंदाज. त्यातच फॅशन क्वीन, अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्याच्यातील फॅशनेबल फलंदाज असो किंवा पती असो किंवा मॉडेल असो अधिकच खुलून येत आहे.

खेळपट्टीवर उतरल्यानंतर स्टान्स घेताच शैलीदार शॉट मारणारा किंग कोहली अर्थात विराट तसे पाहिले तर फॅशनेबल फलंदाज. त्यातच फॅशन क्वीन, अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्याच्यातील फॅशनेबल फलंदाज असो किंवा पती असो किंवा मॉडेल असो अधिकच खुलून येत आहे.

विराटने मंगळवारी एक ट्विट केले त्यात. त्यात प्रत्येक फोटोतील कुर्ता वेगळाच नव्हे आगळावेगळा होता. मान्यवर या कंपनीने विराटची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यासाठी विराट आपल्या ट्वीटर हँडलवरून प्रमोशन करत असतो. असा कुर्ता घालून फोटोसेशन पोस्ट करणे हा त्याच्या कॉन्ट्रॅक्ट एक भाग मानले तर तो जावईशोध ठरणार नाही. (आणि विराटला ट्विटमागे कमाई होते ती वेगळीच, एकूण काय तर चारो नव्हे तर तमाम उंगलिया घी में..)

असो..., तर आपण मुळ मुद्याकडे वळूयात. विराटने हे फोटोसेशन पोस्ट केल्यानंतर त्याला एकीकडे दिलदार चाहच्यांची दाद जशी मिळत आहेच, पण लग्नाच्या मागणीपासून ट्रोलिंग असेही पडसाद उमटत आहेत.

महत्वाचे म्हणजे विरुष्का जोडी हिटच नव्हे तर सुपरहिट होत असतानासुद्धा एका युवतीने त्याला मला प्रपोज कर अशी मागणी घातली आहे @Thesavagegirl या नावाने अकाऊंट असलेल्या, प्रीती इतकेच नाव असलेल्या युवतीने आपला फोटोही पोस्ट केला आहे. त्यात ती सलवार-कमीजमध्ये आहे. त्यात तिची कमनीय शरीरयष्टी दिसून येत आहे, अर्थात चेहरा मात्र झाकला जाईल अशा पद्धतीने तिने फोटो पोस्ट केला आहे. स्वतःला काश्मीर की कली मानणाऱ्या प्रितीने स्वतःला म्हणजे चेहऱ्याला असे गुलदस्त्यात ठेवले आहे.
 

आणखी एका युजरने विराटला त्याचा दृष्टिकोन बदलण्याचा सल्ला दिला आहे. रोहित शर्मावर जळू नकोस, तो खूप भारी आहे त्याला सलामीवीर म्हणून चान्स दे, तुझा जो चमचा आहे (म्हणजे के. एल. राहुल) याला काढून टाक असेही परखडपणे बजावले आहे.

बाकी मग जलवा म्हणजे जाळाच्या स्मायली पोस्ट करीत काही जणांनी दाद दिली आहे. त्यात दाढीधारी-कुर्ताघाली विराटवर स्तुतीसुमनांचा वर्षाव आहे, पण अखेरचे वृत्त हाती यईपर्यंत आजच्या इ-युगात या फोटोसेशन वरील दखल घेण्याजोग्या दोनच प्रतिक्रिया वाटल्या. त्यासाठीच हा पोस्ट प्रपंच


​ ​

संबंधित बातम्या