पडेल नेमार आता पोरकट पोट्टा

मुकुंद पोतदार
Monday, 3 September 2018

रशियातील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत पडेल (दोन्ही अर्थांनी) कामगिरीमुळे सोशल मिडीयावर ट्रोलर्सचे टार्गेट बनलेल्या ब्राझीलच्या नेमारवर आता पोरकट पोट्टा असा शिक्काही बसला आहे. नेमार फ्रेंच अव्वल साखळीत (Ligue1) पॅरीस सेंट जर्मेन एफसीकडून (पीएसजी) खेळतो. शनिवारी या संघाची निमेस ऑलिंपिक क्लबविरुद्ध लढत झाली. त्यात संघाचा पहिला गोल केल्यानंतर नाट्य घडले.नेमारचा हा मोसमातील चौथा गोल होता. नेमारने खाते उघडल्यानंतर अर्जेंटिनाचा अँजेल डी मारा, फ्रान्सचा वर्ल्ड कप स्टार किलीयन एम्बापे आणि उरुग्वेचा एडिसन कवानी यांनी गोल केले. पीएसजीने हा सामना 4-2 अशा फरकाने जिंकला.

रशियातील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत पडेल (दोन्ही अर्थांनी) कामगिरीमुळे सोशल मिडीयावर ट्रोलर्सचे टार्गेट बनलेल्या ब्राझीलच्या नेमारवर आता पोरकट पोट्टा असा शिक्काही बसला आहे. नेमार फ्रेंच अव्वल साखळीत (Ligue1) पॅरीस सेंट जर्मेन एफसीकडून (पीएसजी) खेळतो. शनिवारी या संघाची निमेस ऑलिंपिक क्लबविरुद्ध लढत झाली. त्यात संघाचा पहिला गोल केल्यानंतर नाट्य घडले.नेमारचा हा मोसमातील चौथा गोल होता. नेमारने खाते उघडल्यानंतर अर्जेंटिनाचा अँजेल डी मारा, फ्रान्सचा वर्ल्ड कप स्टार किलीयन एम्बापे आणि उरुग्वेचा एडिसन कवानी यांनी गोल केले. पीएसजीने हा सामना 4-2 अशा फरकाने जिंकला. एम्बापेला नंतर धसमुसळ्या खेळामुळे लाल कार्डला सामोरे जावे लागले.

फ्रेंच लिगमध्ये 20 क्लबचा सहभाग असून या लढतीनंतर गुणतक्त्यात निमेस सातव्या क्रमांकावर आहे, तर पीएसजी आघाडीवर आहे. पीएसजीने गेल्या पाच पैकी चार मोसमांमध्ये जेतेपद मिळविले आहे. पीएसजी ही फ्रेंच लिगमधील महासत्ता असली आणि नेमार हा सुपरस्टार असला तरी निमेसचे समर्थक कट्टर आहेत. कॉस्टीएरेस या आपल्या संघाच्या होमग्राऊंडवर ते जय्यत तयारीने आले होते. त्यांनी chorona असा पोर्तुगीज भाषेतील शब्द लिहीलेला बॅनर आणला होता. याचा इंग्रजीतील अर्थ crybaby, तर मराठीतील अर्थ रडका-चिडका-कुरकुरा मुलगा (म्हणजे आपल्या बोलीभाषेत पोरकट पोट्टा) असा होता. अशाप्रकारे नेमारसाठी त्यांनी कडेकोट मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे नेमारच्या गोलनंतर वेगळेच घडले. नेमारने हा बॅनर आधीच पाहिला होता. त्यामुळे 36व्या मिनिटाला गोल करताच तो बॅनरपाशी धावत गेला आणि त्याने मुळूमुळू रडण्याचे नाटक करीत या चाहत्यांना खिजविले. नेमारचे सहकारी सुद्धा त्याच्यापाशी धावत आले. नेमारचे बॅनरसमोर उभा राहून रडण्याचे नाटक सुरुच होते. कवानीने त्याला अलिंगन दिले आणि तो त्याला संबंधित चाहत्यांपासून बाजूला घेऊन गेला. तोपर्यंत चाहत्यांनी नेमारला शिवीगाळ केली होती. नेमारने मग आपल्या जागेवर जाण्यापूर्वी मागे वळून प्रेक्षकांकडे पाहिले आणि हलकेच टाळ्या वाजवित दाद दिली.

वर्ल्ड कपमधील संदर्भ

विश्वकरंडक स्पर्धा नेमारसाठी धक्कादायक ठरली. मैदानावरील ब्राझीलच्या अपयशाशिवाय वैयक्तिक कामगिरी फ्लॉप ठरल्यामुळे त्याच्यावर टीका झालीच, पण बाद फेरीत मेक्सिकोविरुद्ध मिग्युएल लायून याचा पायाला नुसता स्पर्श होताच तो मैदानावर पडून गडाबडा लोळला. यामुळे नेमारच्या इमेजला तडे गेले.

नेमारला पूर्वीही आहेर

तसे पाहिले तर नेमारचा crybaby असा उल्लेख करून त्याला आहेर मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात चेल्सी आणि स्कॉटलंडचे माजी स्टार क्रेग बर्ली यांनी इएसपीएन वाहिनीवर तज्ज्ञ समालोचक म्हणून नेमारला हेच विशेषण लावले होते. जागतिक फुटबॉलमधील आजघडीचा सर्वांधिक चिडखोर तरुण म्हणजे नेमार असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले होते. मार्सेली आणि आर्सेनलकडून खेळलेल्या रॉबर्ट पायरेस यानेही नेमार स्वतःला समजतो तेवढा भारी नाही अशी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

नेमार विश्वकरंडक स्पर्धेनंतर आता पूर्वीसारखा सुपरस्टार राहिलेला नाही. त्याचे मार्केट कमी होऊ नये म्हणून जिलेट या त्याच्या प्रायोजक कंपनीने खास व्हिडीओ क्लीप तयार केली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना नेमारला आणि पर्यायाने ब्राझीलला पाठिंबा मिळेल सुद्धा, पण एखाद्या देशाच्या लिगमध्ये खेळताना नेमार हा प्रतिस्पर्धी क्लबच्या समर्थकांचे टार्गेट राहणार आणि त्यांना नेमारच्या पडेल वृत्तीमुळे खाद्य मिळत राहणार हेच या प्रसंगातून दिसून आले.
 


​ ​

संबंधित बातम्या