ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एमएसके प्रसाद यांनी निवडले 26 गडी, धोनी-धवनचा विचार नाही

सुशांत जाधव
Sunday, 26 July 2020

कोरोना विषाणूमुळे भारतीय क्रिकेटला मार्चपासून ब्रेक लागला आहे. या परिस्थितीतीतून सावर पुन्हा मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघात कोणत्या खेळाडूला स्थान द्यावे हा निवड समितीसमोर मोठा प्रश्न असेल.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वच स्पर्धांच वेळापत्रक कोलमडले आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील सामन्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर भारतीय संघ  वर्षाअखेरीस नियोजित ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या ताफ्यात 26 जणांचा समावेश करायला हवा, असा सल्ला बीसीसीआय निवड समितीचे माजी प्रमुख एमएसके प्रसाद यांनी दिलाय. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नियमित संघ निवड प्रक्रियेत बदल करावा लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निवडण्यात येणाऱ्या एखाद्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली तर त्याच्या बदली खेळाडू निवडणे सहज शक्य व्हावे यासाठी 26 जणांची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करायला हवी, असे ते म्हणाले.  

IPL 2020 : दुबईच्या मैदानात भारतीय खेळाडूंची पाटी कोरीच!

कोरोना विषाणूमुळे भारतीय क्रिकेटला मार्चपासून ब्रेक लागला आहे. या परिस्थितीतीतून सावर पुन्हा मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघात कोणत्या खेळाडूला स्थान द्यावे हा निवड समितीसमोर मोठा प्रश्न असेल. युएईत रंगणाऱ्या आयपीएलमुळे मर्यादीत षटकांच्य मालिकेसाठी संघ निवडणे सुलभ होईल, पण कसोटीसाठी संघ निवडणे ही निवड समितीसमोर कसोटीच असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. कोरोनाजन्य परिस्थितीतून सावरत परदेशी दौरा करताना अधिक खेळाडूंचा संघात समावेश करुन घेतल्याने युवा खेळाडूंची चाचपणी करणेही शक्य होतील. युवा खेळाडू वरिष्ठ खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुम शेअर करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे, या सकारात्मकतेतून आपण ऑस्ट्रेलिया दौऱ्याकडे पाहायला हवे, असेही एमएसके प्रसाद यांनी सांगितले.  

रोनाल्डोपेक्षा जास्त गोल; अन् तो मेस्सी नव्हे

कोरोनाजन्य परिस्थितीमुळे मार्चपासून भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. कदाचित ऑस्ट्रेलिया दौऱ्याने भारतीय संघाच्या आंतरराष्ट्रीय मालिकेला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ टी20, कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतर्गत खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या क्रमवारी भारतीय संघ 360 गुणांसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे ही कसोटी मालिका जिंकून आपली दावेदारी कायम ठेवण्याचे आव्हान विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघावर असेल. 

एमएसके प्रसाद यांनी निवडलेला 26 सदस्यीय  संघ

सलामीवीर- रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल
मध्यफळीतील फलंदाज- विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, चेतेश्वर  पुजारा, हनुमा विहारी, शुभमन गिल, श्रेयस अय्यर
यष्टीरक्षक- रिषभ पंत, रिद्धिमान साहा
फिरकीपटू- आर अश्विन, रविंद्र जडेजा, शाहबाज नदीम, राहुल चाहर, कुलदीप यादव
अष्टपैलू- हार्दिक पांड्या
जलदगती गोलंदाज - ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, नवदीप सैनी, खलील अहमद, शार्दुल ठाकुर
(मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी गोलंदाज- दीपक चाहर, युजवेंद्र चहल, क्रुणाल पांड्या) 


​ ​

संबंधित बातम्या