वादग्रस्त निर्णयाबद्दल सचिनच्या मनातं काय होतं याचा पंच 19 वर्षें विचार करत होते तर...

सुशांत जाधव
Sunday, 26 July 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या सामन्यादरम्यानच्या लंच ब्रेक मध्ये ते मला भेटले. त्यांनी स्वत:हून मला विचारले की, पायचित बाद दिल्यानंतर सचिनची भावना काय होती, असा किस्सा  एमएसके प्रसाद यांनी सांगितला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एलीट पॅनलमधील माजी पंच डॅरिल हार्पर यांनी सचिन तेंडुलकर संदर्भातील वादग्रस्त ठरलेलल्या मुद्यावर भाष्य करुन दोन दशकापूर्वीचे प्रकरण पुन्हा ताजे केले. 1999 मध्ये एडिलेड कसोटीतील सचिनला पायचित देण्याचा निर्णय योग्यच होता, असे ते म्हणाले होते. एवढ्यावरच न थांबता सचिनला तो बाद असल्याचे मान्य असल्याचेही वक्तव्य केले. यासाठी त्यांनी तत्कालीन भारतीय संघाचे यष्टीरक्षक एमएसके प्रसाद यांच्या नावाचा दाखलाही दिला होता. एमएसके प्रसाद यांनी 2018 मध्ये सचिनला तो निर्णय मान्य होता, असे सांगितले होते. असा दावा त्यांनी केला होता. त्यांचे हे विधान चुकीचे असल्याचे एमएसके प्रसाद यांनी म्हटले आहे. भारतीय क्रिकेट मंडळाच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष यांनी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीमध्ये सचिनसंदर्भातील वादग्रस्त मुद्यावर भाष्य केले. डॅरेल हार्पर खोटे बोलत असल्याचे एमएसके प्रसाद यांनी म्हटले आहे.   

IPL 2020 : दुबईच्या मैदानात भारतीय खेळाडूंची पाटी कोरीच!

एमएसके प्रसाद म्हणाले की, भारतीय क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षस्थानी विराजमान झाल्यानंतर डॅरेल हार्पर यांची भेट घेतली होती. यावेळी वादग्रस्त निर्णयावर माझी टिपण्णी हार्पर यांनी सांगितल्यापेक्षा वेगळी होती. सचिनला वादग्रस्त निर्णयाबद्दल त्यांच्या मनात अनेक वर्षांपासून आरोपी असल्याची भावना होती. 2018 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या सामन्यादरम्यानच्या लंच ब्रेक मध्ये ते मला भेटले. त्यांनी स्वत:हून मला विचारले की, पायचित बाद दिल्यानंतर सचिनची भावना काय होती.

चलो दुबई...जुळवाजुळव सुरु

यावर पंचांनी दिलेल्या निर्णयावर वाद घालत बसणाऱ्यांपैकी सचिन नाही. त्यामुळेच त्याला क्रिकेटच्या देवाची उपाधी दिली जाते, असे त्यांना सांगितल्याचा किस्सा एमएसके प्रसाद यांनी शेअर केला.1999 मध्ये सचिनला दिलेल्या पायचितच्या निर्णयानंतर ड्रेसिंग रुममधील सर्वांनाच आश्चर्य वाटले होते, असेही त्यांनी सांगितले.  ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ग्लेन मेग्राच्या एका उसळता चेंडू सोडण्यासाठी सचिन खाली बसला. यावेळी चेंडू त्याच्या खांद्याला लागला असताना मैदानावरील पंच हार्पर यांनी सचिनला पायचित बाद दिले होते. त्यांच्या या निर्णयाची चांगलीच चर्चा रंगली होती.  


​ ​

संबंधित बातम्या