राहुल, लक्ष्मणने केलं तेच तू कर पुन्हा नक्की संघात येशील; निवड समितीच्या अध्यक्षांचा सल्ला

वृत्तसंस्था
Saturday, 14 September 2019

भारताचा सलामीवीर लोकेश राहुल याला चांगली कामगिरी करण्यात सातत्याने अपयश आल्याने त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले. त्यानंतर निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी त्याला संघात परतण्यासाठी मोलाचा सल्ला दिला आहे. 

नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर लोकेश राहुल याला चांगली कामगिरी करण्यात सातत्याने अपयश आल्याने त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले. त्यानंतर निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी त्याला संघात परतण्यासाठी मोलाचा सल्ला दिला आहे. 

वॉर्नरवर पुन्हा चेंडू कुरतडल्याचा आरोप

त्याला सल्ला देताना ते म्हणाले, ''व्हीव्हीएस लक्ष्मण यालाही एकदा संघातून असेच वगळण्यात आले होते. पण त्यानंतर तो खचला नाही. त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्या. रणजी क्रिकेटमध्ये त्यानं 1400 धावा करत राष्ट्रीय संघात कमबॅक केले होते.''

राहुलला वगळण्याबाबत बोलताना ते म्हणाले,"राहुलला वगळण्याचा निर्णय घेताला त्याच्याशी बोलणं झालं होतं. तो प्रचंड प्रतिभा असलेला खेळाडू आहे. मात्र, दुर्दैवानं त्याला कसोटी क्रिकेटमध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाही. शिखर धवन आणि मुरली विजय यांच्यानंतर अनुभवी फलंदाज म्हणून त्याला अधिक संधी देण्यात आली होती. मात्र, त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.''

राहुलऐवजी रोहित शर्माला सलामीवीर म्हणून संधी देण्यात आली आहे. तसेच 19 वर्षांखालील संघातील स्टार फलंदाज शुभमन गिलला संघात स्थान देण्यात आले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या