चर्चा थांबवा. धोनी निवृत्त होत नाहीये; एमएसके प्रसादांचं स्पष्टीकरण

वृत्तसंस्था
Thursday, 12 September 2019

आज अचानक भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी निवृत्त होणार अशी चर्चा सुरु झाली. तो सायंकाळी सात वाजता पत्रकार परिषद घेऊन त्याची निवृत्ती जाहीर करणार अशाही अफवा पसरल्या. मात्र, निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

नवी दिल्ली : आज अचानक भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी निवृत्त होणार अशी चर्चा सुरु झाली. तो सायंकाळी सात वाजता पत्रकार परिषद घेऊन त्याची निवृत्ती जाहीर करणार अशाही अफवा पसरल्या. मात्र, निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

आज प्रसाद यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला. तेव्हा त्यांना धोनीच्या निवृत्तीबद्दल विचारले असता ते म्हणाले,''धोनीच्या निवृत्तीबाबत अद्याप कोणतीच माहिती नाही. तो आज निवृत्त घेणार अशी चर्चा ऐकून मला धक्काच बसला.''

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आज निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता निर्माण झाली होती. तशी चर्चा क्रिकेटवर्तुळात जोरदार सुरु झाली. कर्णधार विराट कोहलीने धोनीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि सर्वत्र गोंधळा उडाला. त्यामुळेच धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले होते.

2016मध्ये झालेल्या ट्वेंटी20 विश्वकरंडकातील उपांत्यपूर्व फेरीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील धोनीचा आणि त्याचा फोटो कोहलीने शेअर केला आहे. 

दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाने आज आपला संघ जाहीर केला. 

 


​ ​

संबंधित बातम्या