धोनीच्या निवृत्तीबद्दलचं ट्विट डिलीट का केलं? अखेर साक्षीनेच सांगीतले कारण..

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

साक्षीने या सर्वांना उत्तर देत ट्विट केले होते मात्र तीने ते ट्विट लगेच डिलीट देखील केले होते.

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या निवृत्तीबद्दल सतत चर्चा सुरु असते, धोनीच्या सन्यास घेण्याबद्दल सर्वजण मत व्यक्त करताना दिसतात. सोशल मिडीया वेबसाईट ट्विटरवरती #DhoniRetires हा हॅसटॅग ट्रेंड करत होता, त्यानंतर धोनीची पत्नी साक्षीने या सर्वांना उत्तर देत ट्विट केले होते मात्र तीने ते ट्विट डिलीट देखील केले होते. आता तसे करण्यामागील कारण साक्षीने सांगीतले आहे.

साक्षीने महेंद्र सिंग धोनीच्या संन्यास घेण्याबद्दल सोशल मिडीयावर पसरवण्यात येणाऱ्या आफवांना विराम देत एक ट्विट करत चर्चेवर टिका केली होती. काही वेळाने तिने ते केलेलं ट्विट डिलीट केले होते. नुकतेच चैन्नई सुपरकींग्सच्या इंस्टग्राम लाईव्ह दरम्यान रुपा रमानी सोबत गाप्पा मारत असताना ट्विट डिलीट करण्यामागचे कारण सांगीतले आहे. 

जेव्हा धोनीबद्दल आफवा पसरवण्यात येत होती तेव्हा साक्षीने पुढे येत याविषयी महिती देण्याचा निर्णय घेत ट्विट केलं. साक्षीने सांगीतलं की,  “मला माझ्या एका मित्राने त्या हॅशटॅगबद्दल माहिती दिली. नक्की काय चाललंय? दुपारपासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा ट्विटरवर आहेत, असं मला सांगितलं. ते पाहून मला वाटलं की सगळ्यांना खरं काय आहे ते सांगावं. पण मला माहिती नाही की मला काय झालं पण मी ते ट्विट केलं आणि थोड्या वेळाने डिलिट केलं. त्या ट्विटने त्याचं काम केलं होतं आणि जो संदेश मिळायला हवा तो चाहत्यांपर्यंत पोहचला होता.” असे साक्षीने सांगीतले.

भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेला महेंद्र सिंह धोनी हा इंडीयन प्रीमिअर लीग दरम्यान चांगले प्रदर्शन करेल आणि भारतीय संघात स्वतःचे स्थान परत मिळवेल अशी आशा क्रिकेटप्रेमींना वाटत असतानाच, कोरोना व्हायरसमुळे आयपीएल अनिश्चीत काळासाठी स्थगीत करण्यात आले आहे. मैदानावर परतण्याएवजी धोनीच्या निवृत्तीची चर्चा होताना दिसत आहे
 


​ ​

संबंधित बातम्या