Asia Cup 2018 : शास्त्रींच्या अनुपस्थितीत धोनी घेतोय सराव

वृत्तसंस्था
Monday, 17 September 2018

संयुक्त अरब अमिरातीमध्ये सध्या सुरु असलेल्या आशिया करंडकात उद्या (18 सप्टेंबर) भारतीय संघ हाँग काँगविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल. या सामन्यापूर्वी झालेल्या सरावादरम्यान भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने संघाचे मार्गदर्शक रवी शास्त्री यांची भूमिका बजावली. 

दुबई : संयुक्त अरब अमिरातीमध्ये सध्या सुरु असलेल्या आशिया करंडकात उद्या (18 सप्टेंबर) भारतीय संघ हाँग काँगविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल. या सामन्यापूर्वी झालेल्या सरावादरम्यान भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने संघाचे मार्गदर्शक रवी शास्त्री यांची भूमिका बजावली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने फलंदाजांच्या सरावासाठी पाठविलेल्या नवोदित वेगवान गोलंदाजांना धोनीने मार्गदर्शन केले. इंग्लंड दौऱ्यावरुन भारतात परतल्यावर रवी शास्त्री आणि इतर प्रशिक्षकांनी काही दिवसांची विश्रांती घेतल्याने खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी धोनीने पार पाडली. धोनीने मध्यमगती गोलंदाज प्रसिध क्रिष्णा, आवेश खान, सिद्धार्थ कौल आणि फिरकी गोलंदाज मयांक मार्कंडे, शाबाज नदीम यांना मार्गदर्शन केले. भारताच्या इंग्लंड दौऱ्यात सहभागी नसलेल्या खेळाडूंनी यापूर्वीच दुबईला जाऊन सराव करण्यास सुरुवात केली. यात धोनीचाही समावेश होता. 

भारतीय संघातील इतर खेळाडू म्हणजेच शिखर धवन, लोकेश राहुल, हार्दिक पंडया, दिनेश कार्तिक, जसप्रित बुमरा आणि शार्दुल ठाकुर हे इंग्लंड दौऱ्यात सहभागी असल्याने दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर दुबईला रवाना झाले.

संबंधित बातम्या