बाईकवेड्या महेंद्रसिंह धोनीची शिमल्यात राईड

वृत्तसंस्था
Wednesday, 29 August 2018

शिमला : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे बाईक प्रेम आपल्याला सर्वांना परिचीत आहेत. पण, सध्या एका जाहिरातीच्या शूटींगसाठी शिमल्यात आला असताना त्याला बाईक चालविण्याचा मोह आवरता आला नाही. त्याने शिमल्यातही बाईक चालवण्याचा आनंद लुटला. धोनी बाईक चालवतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

Who wanna go for a Ride with Mahiya?

A post shared by Mahi (@dhoni7781__) on

धोनी 2004 मध्ये शेवटचा शिमल्यात आला होता. तो 31 ऑगस्टपर्यंत शिमल्यात राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धोनीला हिमाचल प्रदेश सरकारकडून सरकारी पाहुण्याचा दर्जा दिला आहे. यावर काँग्रेसने मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

MS Dhoni and Arun Pandey enjoying some ride in Shimla!

A post shared by Mahi (@dhoni7781__) on

धोनीने शिमल्यात ऐतिहासिक रिज मैदानावर शूटिंग केली. त्यानंतर तो शिमल्याच्या रस्त्यांवर बाईक चालवताना दिसला. धोनी हिमाचलमध्ये उत्तेजक द्रव्य विरोधी मोहीमेतही सहभागी होणार आहे. धोनीने इन्टाग्रामवर नुकताच कुत्र्यांसोबत सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यालाही चांगली पसंती मिळाली होती.

​ ​

संबंधित बातम्या