धोनी आज करणार निवृत्तीची घोषणा; सात वाजता परिषद?

वृत्तसंस्था
Thursday, 12 September 2019

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आज निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे. तशी चर्चा क्रिकेटवर्तुळात जोरदार सुरु आहे. कर्णधार विराट कोहलीने धोनीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि सर्वत्र गोंधळा उडाला. त्यामुळेच धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले.

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आज निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे. तशी चर्चा क्रिकेटवर्तुळात जोरदार सुरु आहे. कर्णधार विराट कोहलीने धोनीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि सर्वत्र गोंधळा उडाला. त्यामुळेच धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले.

2016मध्ये झालेल्या ट्वेंटी20 विश्वकरंडकातील उपांत्यपूर्व फेरीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील धोनीचा आणि त्याचा फोटो कोहलीने शेअर केला आहे. या सामन्यात धोनीनं कोहलीला एकेका धावेसाठी अक्षरशः पळवलं होतं. त्यामुळे कोहलीची पुरती दमछाक झाली होती. त्यामुळेच सामन्यानंतर कोहलीनं खेळपट्टीवर गुडघे टेकले.

 याच सामन्यातील त्या अखेरच्या क्षणाचा फोटो कोहलीनं शेअर केला. त्यात त्यानं लिहिले की,''हा सामना मी कधीच विसरणार नाही. ती अविस्मरणीय रात्र होती. माहीनं मला तंदुरुस्तीची चाचणी देत असल्यासारखे पळवले होते.'' कोहलीच्या या ट्विटनंतर धोनीच्या निवृत्तीचा चर्चांना वेग आला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 161 धावांचा पाठलाग करताना कोहलीने नाबाद 82 धावा केल्या होत्या तर धोनीने नाबाद 18 धावा केल्या होत्या. अखेरच्या षटकात चार धावांची गरज असताना धोनीने विजयी चौकार मारत भारताला उपांत्यफेरीत प्रवेश मिळवून दिला होता. विश्वकरंडकानंतर धोनीने निवृत्त व्हावं, अशी मागणी जोर धरत होती. त्यानंतर त्यानं वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धोनी आज निवृत्तीची घोषणा करतो की काय, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. 


​ ​

संबंधित बातम्या