Asia Cup 2018 : 'Captain Cool' is back..!

वृत्तसंस्था
Tuesday, 25 September 2018

आशिया करंडक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. धोनीचा कर्णधार म्हणून हा 200 वा सामना आहे. 

दुबई : आशिया करंडक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. धोनीचा कर्णधार म्हणून हा 200 वा सामना आहे. 

आशिया करंडकासाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्याने भारतीय संघाचे नेतृत्व सलामीवीर रोहित शर्माकडे देण्यात आले. भारतीय संघ यापूर्वीच आशिया करंडकाच्या अंतिम फेरीत पोहोचल्याने रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली. त्यामुळेच भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा एकदा भारताचा सर्वात यशस्वी आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीकडे सोपविण्यात आली आहे. 

 

तब्बल 696 दिवसांनंतर धोनी भारताचे कर्णधारपद भूषवत आहे. भारताचा कर्णधार म्हणून धोनीने ऑक्टोबर 2016मध्ये शेवटचा सामना खेळला होता. मैदानावर नाणेफेकीच्यावेळी रोहितऐवजी धोनी आल्याने सर्व प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे 200 वेळा नेतृत्व करणारा तो आशिया खंडातील पहिला खेळाडू ठरला आहे. 

तसेच वेगवान गोलंदाज दीपक चहरही या सामन्यातून पदार्पण करत आहे. शिखर धवन, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रित बुमरा यांना विश्रांती देण्यात आली असून मनीष पांडे आणि खलील अहमद यांना संघात स्थान देण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या