माजी सिलेक्टर म्हणाले; धोनी पूर्वीसारखा फिट दिसत नाही!

सुशांत जाधव
Saturday, 1 August 2020

यंदाच्या वर्षातील आयपीएलच्या 13 व्या हंगामात महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्जच्या नेतृत्व करताना मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे.

भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू रोजर बिन्नी यांनी धोनीच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. धोनीचा फिटनेस पूर्वीसारखा राहिलेला नाही. त्यामुळे त्याने आता युवा खेळाडूंना संधी द्यायला हवी, असे रोजर बिन्नी यांनी म्हटले आहे. रॉजर बिन्नी हे 1983 विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असून त्यांनी भारतीय क्रिकेट मंडळाच्या निवड समितीमध्येही भूमिका बजावली आहे. रोजर बिन्नी यांनी स्पोर्ट्स कीडाला दिलेल्या मुलाखतीमध्ये धोनीने आता थांबायला हवे, असे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, मागील काही कालावधीपासून धोनीचे निरीक्षण करतोय. पूर्वीपेक्षा तो अगदी वेगळा आहे. सामन्याला कलाटणी देण्याची त्याच्यातील क्षमता, त्याच्या अंगी असलेली निर्णय क्षमता, तो खेळाडूंना करत असलेले प्रोत्साहन या सर्व गोष्टीकडे आपण भूतकाळ म्हणूनच पाहायला हवे. धोनीमध्ये पूर्वीसारखा फिटनेस राहिलेला नाही. याशिवाय नव्या खेळाडूंनी आपल्यात क्षमता असल्याचे दाखवून दिले आहे, यावरही त्यांनी जोर दिला.  

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

महेंद्रसिंह धोनीने इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. भारतीय संघाला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात धोनीची जादू चालली नाही. या स्पर्धेपूर्वीपासूनच धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली होती. भारतीय संघाने विश्वचषक जिंकला तर धोनी निवृत्तीची घोषणा करु शकतो, असेही बोलले गेले. मात्र भारताने विश्वचषकही जिंकला नाही आणि धोनीने निवृत्तीसंदर्भात भूमिकाही स्पष्ट केलेली नाही.  

फिफा झाली मेहरबान ; 211 देशांना देणार आर्थिक सहाय्य

यंदाच्या वर्षातील आयपीएलच्या 13 व्या हंगामात महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्जच्या नेतृत्व करताना मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेतील त्याच्या कामगिरीवर त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे उघडले जाऊ शकतात, अशी चर्चाही रंगताना पाहायला मिळते. बीसीसीआयच्या नव्या करारात धोनीच्या नावच नसल्यामुळे त्याच्या पुनरागमनाची शक्यता धूसरच आहे. तरीही त्याच्या चाहत्यांना धोनीच्या निर्णयाची प्रतिक्षा आहे. निवृत्तीच्या विषयावर धोनी  मौन धारण करुन आहे. 


​ ​

संबंधित बातम्या