स्वतःच्या क्रिकेट संन्यासाबद्दल निर्णय घेण्याचा हक्क धोनीला आहे : गॅरी कर्स्टन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

धोनीने भारतीय क्रिकेट संघातील धोनीचे जे स्थान आहे त्यानुसार धोनी त्याच्या संन्यासाचा निर्णय स्वतः घेऊ शकतो असे सडेतोड मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी व्यक्त केले आहे. 

धोनीच्या निवृत्ती घेण्याबद्दलची चर्चा सोशल मिडीयावरती सतत होताना दिसते, मात्र महेंद्र सिंह धोनी क्रिकेटमधून संन्यास कधी घेणार या प्रश्नाचे उत्तर मात्र तो स्वतःच देऊ शकेल. पण मैदानावर अत्यंत संयमाने खेळणाऱ्या धोनीने अद्याप याविषयावर गप्प राहाणेच पसंद केले आहे. यादरम्यान धोनीने भारतीय क्रिकेट संघातील धोनीचे जे स्थान आहे त्यानुसार धोनी त्याच्या संन्यासाचा निर्णय स्वतः घेऊ शकतो असे सडेतोड मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी व्यक्त केले आहे. 

सोशल मीडीयावर धोनी क्रिकेटमधून संन्यास घेण्याच्या तयारीत असल्याचा चर्चा बुधवारी अचानक सुरु झाली. धोनीच्या संन्यासाबद्दलची बातमी मायक्रोब्ल़ॉगींग वेबसाईट ट्विटर वर सर्वात वरती ट्रेंड करत होती. धोनी क्रिकेटमधून संन्यास घेणार असे वाटत असताना धोनीची पत्नी साक्षीने मोर्चा सांभाळत या सगळ्या चर्चा खोटी असल्याचे शांगीतले आणि आचानक स्वतःचे ट्विट डिलीट करत चाहत्यांना संभ्रमात टाकले होते.

"यंदाच्या आयपीएल आयोजनाबद्दल अनिल कुंबळे, वीवीएस लक्ष्मण आशावादी"

“महेंद्र सिंह धोनी हा अतुलनिय क्रिकेटचपटू आहे, त्याच्याकडे प्रचंड बुध्दीमत्ता, शांत स्वभाव, ताकत, फिटनेस, स्पिड आणि सामना जिंकून देण्याची क्षमता आहे ज्यामुळे तो विशेष खेळाडू आहे. वर्तमान खेळाडूंपैकी तो महान खेळाडू आहे. धोनीने खेळणे सोडण्याचा आधिकार मिळवला आहे, त्यामुळे त्याला हवे तेव्हा स्वतःच्या अटींवरती तो निर्णय घेईल. त्याला खेळणे बंद कर अशी सूचना देण्याचा हक्क कोणालीहा नाही.” असे मत कर्स्टन यांनी व्यक्त केले आहे

भारताच्या विश्वचषक 2011 च्या विजेत्या संघाचे प्रशिक्षक राहिलेले गॅरी यांनी त्या विजयाची आठवण काढत त्यांनी सांगीतले की त्यावेळी खेळाडूंकडून सगळ्याना खूप आपेक्षा होत्या आणि सर्वजण त्या आपेक्षांवर पुर्णपणे खरे ठरले होते असेही कर्स्टन यांनी सांगीतले. कोरोना व्हायरस संक्रमणाचा धोका पाहाता आयपीएल स्थगीत करण्यात आले आहे, चैन्नई सुपरकिंग्स संघाचे नेतृत्व महेंद्र सिंह धोनी करताना दिसला असता. 


​ ​

संबंधित बातम्या