धोनी घरी घेतोय 'यांचा' सराव

वृत्तसंस्था
Friday, 24 August 2018

भारतीय संघ इंग्लंडसोबत कसोटी सामने खेळत असल्याने महेंद्रसिंह धोनी सध्या घरी त्याच्या परिवारासह वेळ घालवत आहे. त्याने नुकताच त्याच्या कुत्र्यांसोबत खेळतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

रांची : भारतीय संघ इंग्लंडसोबत कसोटी सामने खेळत असल्याने महेंद्रसिंह धोनी सध्या घरी त्याच्या परिवारासह वेळ घालवत आहे. त्याने नुकताच त्याच्या कुत्र्यांसोबत खेळतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

या व्हिडिओमध्ये तो त्याच्या कुत्र्यांना ट्रेनिंग देताना दिसत आहे. ''थोडीशी माया, थोडा कॅचिंगचा सराव आणि त्याच्याबदल्यात प्रचंड प्रेम'' असे लिहीत त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

धोनी सध्या सोशल मीडियावर सतत काहीना काही शेअर करत असतो. नुकताच त्याने त्याची मुलगी झिवासह खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यालाही प्रेक्षकांनी प्रचंड लाईक्स दिले होते. 

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे कुत्र्यांवर असलेले प्रेम सर्वश्रुत आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की मी सामना जिंकलो किंवा पराभूत झाले तरी माझी कुत्री मला सारखीच वागणूक देतात. 
 


​ ​

संबंधित बातम्या