INDvsBAN :  घ्या आता, तुम्हीच आणून बसवलाय त्याला आमच्या डोक्यावर

वृत्तसंस्था
Friday, 8 November 2019

पंतला आजवर कधीच चांगले यष्टीरक्षण करायला जमले नाही. भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या दुसऱ्या ट्वेंटी20 सामन्यात त्याने मोक्याच्या क्षणी चूक केली आणि भारतीय संघाला त्याचा फटका बसला. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांना आता एमएसके प्रसादांना धारेवर धरले आहे. 

राजकोट : विश्वकरंडकानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटमधून ब्रेक घेतला. तेव्हापासून भारतीय संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी रिषभ पंतकडे सोपविण्यात आली आहे. निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवडताना ''आम्ही आता धोनीच्या पलिकडे जाऊन विचार करत आहोत. म्ङणूनच आम्ही रिषभ पंतला संघात स्थान दिले आहे,'' असे स्पष्टीकरण दिले होते. 

INDvsBAN : पंत, संघाला नेहमी लाज आणायचं स्किल येतं कुठून रे?

MSK Prasad

मात्र, पंतला आजवर कधीच चांगले यष्टीरक्षण करायला जमले नाही. भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या दुसऱ्या ट्वेंटी20 सामन्यात त्याने मोक्याच्या क्षणी चूक केली आणि भारतीय संघाला त्याचा फटका बसला. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांना आता एमएसके प्रसादांना धारेवर धरले आहे. 

ऋषभ पंत ने विकेटकीपिंग में किया बड़ा ब्लंडर, सोशल मीडिया पर उड़ा मजाक

काय आहे प्रकरण
सामन्याच्या सहाव्या षटकात युझवेंद्र चहल गोलंदाजी करत असताना रिषभ पंतने बांगलादेशचा सलामीवीर लिटन दासला यष्टीचित केले. भारतीय संघाने तो बाद झाला म्हणून आनंदी साजरा केला. मात्र, त्यांचा आनंद फार काळ टीकला नाही. हे प्रकरण तिसऱ्या पचांकडे गेले. 

रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते की पंतने चेंडू यष्टींच्या पलिकडे पकडला होता. त्याच्या ग्लव्ह्जचा काही भाग यष्टींच्या पुढे होता.  त्यामुळे पंचांनी हा नोबॉल ठरवत लिटनला नाबाद घोषित केले. पुढच्या चेंडूवर फ्रिहिट मिळालेल्या लिटनने चौकार ठोकला. त्याची ही चूक पाहून रोहित शर्मा खूपच नाराज दिसत होता तर सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे.

 

संबंधित बातम्या