लॉकडाउन काळात महेंद्रसिंह धोनी करतोय हे काम, साक्षीने शेअर केला फोटो

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

पत्नी साक्षीने धोनीचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. 

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील खेळाडू घरामध्येबसून दिवस काढत आहेत, जगभरातील सर्व लाहन-मोठ्या क्रीडा आयोनावर कोरोना व्हायरसचा प्रभाव पडला आहे. काही खेळाडूंनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी गप्पा मारणे सुरु केले आहे, तर काही खेळाडू त्यांच्या कुटूंबासोबत घरामध्येच वेळ घालवत आहेत. कोरोनाचा धोका ळक्षात घेऊन सगळ्या क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याने भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू देखील त्यांच्या घरामध्येच वेगवेगेळ्या कामात व्यस्त दिसत आहेत.

भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याचे कारकीर्दीतील महत्त्वाचे लक्ष्य 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी देखील घरातील त्याचा वेळ अशीच कामे करताना घालवत आहे. त्याची पत्नी साक्षीने त्याचा असाच एक फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये धोनी त्याच्या घरातील बागेमध्ये मशीनच्या मदतीने गवत कापताना दिसत आहे. साक्षी सोशल मिडीयावर जास्त काही पोस्ट करत नाही. पण धोनीच्या या फोटोला त्याच्या चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मीळत आहे.

 

 

महेंद्रसिंह धोनीने विश्वचषक सामन्यात न्यूझीलंडकडून भारताला परभवानंतर मिळाल्यापासून एकही अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही. येत्या आयपीएल मध्ये त्याच्या चहात्यांना त्याला परत एकदा मैदानावर क्रिकेट खेळताना पाहण्याची संधी मिळणार होती. पण कोरोना व्हायरसमुळे इंडीयन प्रीमिअर लीगचे सामने बीसीसीआयने 15 एप्रिल पर्यंत स्थगीत केले आहेत. आयपीएलच्या भविष्याबद्दल 15 एप्रिल च्या नंतरच विचार केला जाण्याची शक्यता आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या