धोनी भाई तुझं करिअर संपवेल, श्रीसंतचा स्टोक्सला शाब्दिक मारा

टीम ई-सकाळ
Tuesday, 9 June 2020

लिखाणाच्या माध्यमातून धोनीवर केलेली टिका श्रीसंतला चांगलीच खूपली आहे. यावर त्याने स्टोक्सला धमकी वजा इशारा दिलाय.

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसंदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूचा श्रीसंतने खरपूस समाचार घेतलाय. इंग्लंडच्या संघातील अष्टपैलू बेन स्टोक्सने नुकतेच आपले पुस्तक प्रकाशित केले. 'ऑन फायर' या शिर्षकाखाली लिहिलेल्या पुस्तकातून स्टोक्सने धोनीसंदर्भात वादग्रस्त टिपण्णी केली आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत यजमानांच्या विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय संघाने हा सामना जिंकण्याचा म्हणावा तसा प्रयत्न केला नाही, असा उल्लेख स्टोक्सने आपल्या पुस्तकात केला आहे. सामना भारताच्या बाजूने झुकलेला होता. पण धोनीने अपेक्षित फटकेबाजी केली नाही, असेही स्टोक्सनं लिहलं आहे. लिखाणाच्या माध्यमातून धोनीवर केलेली टिका श्रीसंतला चांगलीच खूपली आहे. यावर त्याने स्टोक्सला धमकी वजा इशारा दिलाय.

#वर्णभेदाचा_खेळ : तिच्या उदरातील बाळावरही झाली होती विकृत टिपण्णी

धोनीसोबत आमने सामने यायची वेळ येऊ नये, यासाठी स्टोक्सने प्रार्थना करावी. जर तू धोनी भाईच्या समोर आलास तर तुझी कारकिर्द संपुष्टात येईल, अशा शब्दांत श्रीसंतने स्टोक्सला सुनावले आहे. धोनी कोणतीही गोष्ट विसरत नाही, असेही श्रीसंतने म्हटलंय. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून या प्रकरणावर भाष्य करताना श्रीसंत म्हणाला की, मी स्टोक्सला इतक सांगू इच्छितो की, धोनीची मेमेरी शार्प आहे. धोनी कोणत्याही गोष्टी विसरत नाही. आयपीएल किंवा भारत-इंग्लंड यांच्यातील सामन्यादरम्यान पुन्हा धोनीसमोर आलास तर तुझी कारकिर्दच संपुष्टात येईल. श्रीसंत पुढे म्हणाला की, स्टोक्स कधीच धोनी भाईची विकेट घेऊ शकत नाही. जगातील अष्टपैलू खेळाडू असला तरी त्याला ते जमणार नाही. स्टोक्स 4-5 वर्षांपासून खेळतोय. मी असताना तो नव्हता. स्टोक्सला गोलंदाजी करण्याची इच्छा आहे. धोनीविषयी केलेल्या वक्तव्याचा मी निश्चित बदला घेईन, असेही श्रीसंतने म्हटले आहे.   

 '...तर BCCI ला IPL स्पर्धा घेण्याचा अधिकार'

2007 ची टी-20 आणि 2011 मध्ये मर्यादित षटकाच्या विश्वचषकात श्रीसंतने धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. श्रीसंतने भारताकडून 27 कसोटी सामन्यात 87 बळी मिळवले आहेत. 53 वनडे सामन्यात त्याच्या नावे 75 विकेट्स असून 10 टी-20 सामन्यात त्याने 7 बळी मिळवले आहेत. आयपीएलमधील 44 सामन्यात त्याच्या खात्यात 40 बळींची नोंद आहे. 


​ ​

संबंधित बातम्या