ब्रावोनं आपल्या कॅप्टनला दिलं खास गिफ्ट; सोशल मीडियावर नवा विक्रम होणार

टीम ई-सकाळ
Tuesday, 7 July 2020

ड्वेन ब्रावोने धोनीसाठी प्रसिद्ध केलेल्या गाण्याला 'हेलीकॉप्‍टर-7' असं नाव दिलंय. या गाण्यातून त्याने धोनीचा संघर्ष, आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम आणि धोनीची हेलिकॉफ्ट शॉटकडेही लक्ष वेधले आहे.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या वेस्ट इंडिजच्या अष्टपैलू ड्वेन ब्रावोने आपला शब्द खरा करुन दाखवलाय. त्याने महेंद्र सिंह धोनीला वाढदविसाच्या हटके शुभेच्छा दिल्यात. ब्रोवोने धोनीसाठी एक खास गाणे तयार केले आहे.  यातून त्याने धोनीचा रांचीपासून ते वर्ल्ड कप विजेतेपद पटकावण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. मी धोनीला दिलेला शब्द पाळला या कॅप्शनसह  ब्रावोने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हे गाणं शेअर केलंय. ब्रावोने धोनीच्या वाढदिवशी रिलीज केलेल्या गाण्याला सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रियता मिळताना दिसत आहे. ब्रावोने इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिलंय की, आता प्रतिक्षा संपली! महेंद्रसिह धोनी जगभरातील लोकांसाठी एक प्रेरणास्थान आहे. आम्ही तुझा वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी सज्ज आहोत, अशी शब्दांत ब्रोवोने धोनीविषयीच्या आपल्या मनातील भावना व्यक्त केल्यात.  

धोनी इन्स्टावर फक्त तिघांनाच करतो फॉलो

ड्वेन ब्रावोने धोनीसाठी प्रसिद्ध केलेल्या गाण्याला 'हेलीकॉप्‍टर-7' असं नाव दिलंय. या गाण्यातून त्याने धोनीचा संघर्ष, आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम आणि धोनीची हेलिकॉफ्ट शॉटकडेही लक्ष वेधले आहे. चेन्नई सुपर किंग्जने देखील आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ब्रावोचे गाणे शेअर केले आहे. 'हेलीकॉप्‍टर 7 ने उड्डाण भरले आहे. ड्वेन ब्रावोचा थलैवा एमएस धोनीला सलाम! असा उल्लेख करत चेन्नई सुपर किंग्जने आपल्या कर्णधाराला शुभेच्छा दिल्या.क्रिकेटच्या मैदानात आपल्या अष्टपैलू खेळीनं प्रभावित करणाऱ्या ब्रावो गाण्यामुळेही चांगलाच प्रकाश झोतात आलो. यापूर्वी त्याचे 'चॅम्पियन' हे गाणं चांगलच हिट ठरलं होते. त्यानंतर आता धोनीच्या गाणही मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतेय. ब्रावोने गाणं प्रसिद्ध केल्यानंतर लाखो लोकांनी हे गाण पाहिलं असून धोनीसाठी केलेल्या खास गाण्याचा ब्रावोच्या नावावर अनोखा विक्रम होणार का? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

- क्रिडा जगतातील  बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

विश्वचषकातील सेमीफायनलमधील भारतीय संघाच्या पराभवानंतरपासून धोनी मैदानापासून दूर आहे. यंदाच्या बीसीसीआय करारातही त्याच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चाही रंगल्या. दरम्यान आयपीएलसाठी त्याने सराव सुरु केल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर तो पुन्हा संघात स्थान मिळवू शकेल, अशी चर्चा रंगली. पण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर खेळाला लागलेल्या ब्रेकमुळे धोनी पुन्हा मैदानात उतरल्याचे पाण्यासाठी आता आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. 


​ ​

संबंधित बातम्या