हरित नोहवर जीननचा विजय

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 September 2018

जयपूर : दुबईतील रायडिंगच्या अनुभवाचा फायदा उठवित अंगटा रेसिंगच्या सी. डी. जीनन याने एमआरएफ मोग्रीप एफएमएससीआय राष्ट्रीय सुपरक्रॉस मालिकेतील चौथ्या फेरीत फॉरेन ओपन गटासह सर्वोत्तम रायडरचा किताब मिळविला. चुरशीच्या शर्यतीत त्याने टीव्हीएस रेसिंगच्या हरित नोह याला मागे टाकत दोन्ही मोटो जिंकले.

जयपूरमधील मानसरोवर परिसरात रविवारी ही फेरी पार पडली. मागील मोसमातही जीननने जयपूरला बाजी मारली होती. आदल्यादिवशी पाऊस पडल्यामुळे ट्रॅक आव्हानात्मक बनला होता. फॉरेन ओपन गटात टीव्हीएस रेसिंगची मदार हरितवर होती, पण हरित दोन्ही मोटोत दुसरा आला. नाशिकच्या यश पवारने तिसरे स्थान मिळविले.

या फेरीअखेर हरितचे 144, तर जीननचे 126 गुण झाले आहेत. त्यांच्यातील फरक 24 वरून 18 वर आला आहे. क्लास दोन (नवोदीत) व क्लास पाच (इंडिन एक्स्पर्ट) यांत टीव्हीएस रेसिंगने पहिले तीन क्रमांक मिळविले. यात अनुक्रमे इम्रान पाशा व कालीमोहन जिंकले.

ज्यूनीयर गटात पुण्याच्या सार्थक चव्हाणने विजेतेपद मिळविले.

 मालिकेचे प्रवर्तक गॉडस्पीडचे प्रमुख व माजी आंतरराष्ट्रीय रायडर श्याम कोठारी यांनी सांगितले की, पावसामुळे नेहमीसारखी सरावाची संधी मिळाली नसतानाही रायडर्सनी आपले कौशल्य पणास लावले. आव्हानात्मक ट्रॅकवर प्रत्येक शर्यत रंगली. त्यामुळे तसेच फ्रीस्टाईल स्टंटमुळे प्रेक्षकांना पर्वणी मिळाली.

सविस्तर निकाल

क्लास 1 (फॉरेन ओपन) - 1) सी. डी. जीनन (अंगटा रेसिंग, कावासाकी, पहिला मोटो 20 गुण, दुसरा मोटो 20, एकूण 40), 2) हरित नोह (टीव्हीएस रेसिंग, टीव्हीएस आरटीआर,17, 17, 34), 3) यश पवार (नाशिक, कावासाकी, 13, 15, 28), 4) इ. एस. साईजीत (13 रेसिंग, कावासाकी, 15, 9, 24) 5) व्ही. एम. महेश (अंगटा रेसिंग, कावासाकी, 10, 13, 23)

क्लास 2 (नोव्हीस) – 1) इम्रान पाशा (टीव्हीएस रेसिंग, आरटीआर), 2) डी. सचिन (टीव्हीएस रेसिंग, आरटीआर), 3) कालीमोहन (टीव्हीएस रेसिंग, आरटीआर), 4) असिफ गौर (जयपूर, इम्पल्स), 5) नितीन सिंग (जयपूर, इम्पल्स)

क्लास 4 (स्थानिक) - 1) संतोष बिश्नोई (इम्पल्स), 2) राजू माथूर (इम्पल्स), 3) असिफ गौर (इम्पल्स), 4) रवीकांत शर्मा (इम्पल्स), 5) नितीन सिंग (इम्पल्स)

क्लास 5 (इंडियन एक्स्पर्ट) – 1) कालीमोहन (टीव्हीएस रेसिंग, आरटीआर), 2) इम्रान पाशा (टीव्हीएस रेसिंग, आरटीआर), 3) सॅम्युएल जेकब (टीव्हीएस रेसिंग, आरटीआर), 4) जगदीश कुमार (कोईमतूर, इम्पल्स), 5) आर. नटराज (टीव्हीएस रेसिंग, आरटीआर)

क्लास 6 – 1) गजेंद्र जांगीड (जोधपूर, इम्पल्स), 2) जगदीश कुमार (कोईमतूर, इम्पल्स), 3) कार्तिकेयन (पोल्लाची, इम्पल्स), 4) मणीकंदन (कोईमतूर, इम्पल्स), 5) असिफ गौर (जयपूर, इम्पल्स)

क्लास 7 – 1) इ. एस. साईजीत (13 रेसिंग, कावासाकी), 2) पृथ्वी सिंग (चंडीगड, कावासाकी), 3) यश पवार (नाशिक, कावासाकी), 4) व्ही. एम. महेश (अंगटा रेसिंग, कावासाकी), 5) कयान पटेल (मुंबई, सुझुकी)

क्लास 8 – 1) व्ही. प्रज्वल (बंगळुर, केटीएम), 2) इक्षण शानभाग (सातारा, केटीएम), 3) गौरांग नाईक (पुणे, होंडा), 4) सार्थक चव्हाण (पुणे, कावासाकी), 5) श्लोक घोरपडे (सातारा, कावासाकी)

क्लास 9 – 1) सार्थक चव्हाण (पुणे, कावासाकी), 2) श्लोक घोरपडे (सातारा, कावासाकी), 3) जितेंद्र संगवे (कोल्हापूर, केटीएम), 4) राहीश खत्री (मुंबई, केटीएम), 5) अक्षत हुपळे (कोल्हापूर, कावासाकी)

​ ​

संबंधित बातम्या