Pune Half Marathon : अब हर कोई बनेगा फिनिशर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 December 2019

पुणे : बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला अवास्तव ताण न घेता समाधानकारक वेळेत शर्यत पूर्ण करता यावी या उद्देशाने संयोजकांनी दिग्गज धावपटूच्या नेतृत्वाखालील एका पेस टीमची नियुक्ती केली आहे. आयर्नमॅन आणि कॉम्रेड््स या विलक्षण आव्हानात्मक शर्यती पुर्ण केलेल्या अतुल गोडबोले याची मोटीव्ह8 ही अधिकृत पेस टीम 22 डिसेंबर रोजी सक्रीय असेल.

पुणे : बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला अवास्तव ताण न घेता समाधानकारक वेळेत शर्यत पूर्ण करता यावी या उद्देशाने संयोजकांनी दिग्गज धावपटूच्या नेतृत्वाखालील एका पेस टीमची नियुक्ती केली आहे. आयर्नमॅन आणि कॉम्रेड््स या विलक्षण आव्हानात्मक शर्यती पुर्ण केलेल्या अतुल गोडबोले याची मोटीव्ह8 ही अधिकृत पेस टीम 22 डिसेंबर रोजी सक्रीय असेल.

No photo description available.

एपीजी रनिंगचे सीईओ आणि संस्थापक तसेच या मॅरेथॉनचे प्रवर्तक विकास सिंग यांनी याविषयी अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पेसिंगसाठी आम्ही एकमेव जोडीदार म्हणून मोटीव्ह8ची नियुक्ती केली आहे. त्यांच्या धावपटूंनी तावून सुलाखून जात आपली पद्धत विकसित केली आहे. ती सर्वांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.

मोटीव्ह8तर्फे धावण्याच्या शर्यती आणि ट्रायथलॉनसाठी एन्ड्यूरन्स स्पर्धकांना तंदुरुस्तीचे प्रशिक्षण दिले जाते. विविध प्रकारची क्षमता असलेल्या हजारो धावपटूंना त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि साथीचा फायदा झाला आहे. त्यामुळे 10 किलोमीटरपासून अगदी आयर्नमॅन, कॉम्रेड््स अशा अल्ट्रा शर्यतींमध्ये यश मिळविणे त्यांच्यासाठी सुकर ठरले आहे.

दमसास पणास लावणाऱ्या क्रीडाप्रकारांमध्ये उल्लेखनी कामगिरी व्हावी म्हणून स्पर्धकांची कामगिरी योग्य वेळेत होणे अनन्यसाधारण महत्त्वाचे असते. बहुतांश स्पर्धक हौशी असतात. त्यांना शास्त्रशुद्ध आणि शिस्तबद्ध मार्गदर्शनाची नितांत गरज असते. अशा स्पर्धांचा अनुभव असलेल्या मान्यताप्राप्त धावपटूंनी त्यांना मार्गदर्शन करायला हवे. प्रारंभीच वाजवीपेक्षा वेगाने किंवा हळू धावल्यास त्याचा अखेरीस फटका बसतो. अशावेळी आपल्या तंदुरुस्तीनुसार, तयारीनुसार नियोजन केले आणि त्या जथ्यात धावले तर उद्दीष्ट साध्य होते. यामुळे पेस टीम प्रत्येकासाठी गरजेची ठरते. यामुळे अतुल गोडबोलेच्या मोटीव्ह8चे बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन परिवारात आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. 
- विकास सिंग, एपीजी रनिंगचे संस्थापक, सीईओ, शर्यतीचे प्रवर्तक

Image may contain: 1 person, smiling, standing

दृष्टिक्षेपात
- पेस टीमचे धावपटू 5 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि हाफ मॅरेथॉनमध्ये धावणार
- प्रत्येक जण पूर्वनिश्चीत वेळेत शर्यत पूर्ण करणार
- सहभागी स्पर्धक त्यांच्या उद्दिष्टानुसार विशिष्ट वेळेच्या जथ्यात धावू शकणार
- अखेरपर्यंत या जथ्यासह धावल्यास वेळेचे लक्ष्य गाठण्याची संधी
- पेस टीममधील धावपटू मार्गाचे स्वरुप, आव्हान आणि गरजांनुसार नियोजन करणार
- सहभागी स्पर्धकांना निर्धारीत वेळेच उद्दीष्ट गाठता यावे म्हणून परिणामकारक नियोजनाची पेस टीमवर जबाबदारी

अतुल गोडबोले यांच्याविषयी
- मोटीव्ह8 कोचिंगचा संस्थापक आणि मुख्य प्रशिक्षक
- तीन वेळा कॉम्रेड््स शर्यतींत फिनीशर
- आयर्नमॅन किताबाचाही मानकरी
- आयर्नमॅन 70.3 जागतिक स्पर्धेची पात्रता साध्य


​ ​

संबंधित बातम्या