मानसिक दबाव झेलण्यासाठी क्रिकेटरला आईने दिला खास सल्ला

टीम ई-सकाळ
Tuesday, 30 June 2020

कोरोनाजन्य परिस्थितीतून सावरत मैदानात उतरणारे सर्व सामने हे पूर्वीप्रमाणे सामान्यच असतील . हे समजावून मैदानात उतरण्यासाठी मानसोपचार तज्ञ डॉक्टरांची मदत घेत आहे. ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरण्यापूर्वी खुद्द आपल्या आईने खास सल्ला दिल्याचेही त्याने सांगितले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित झालेल्या क्रिकेटला इंग्लंडच्या मैदानात पुन्हा सुरुवात होणार आहे. कोरोनाच्या खबरदारीच्या पार्श्वभूमीवर तीन सामन्यांची कसोटी मालिका प्रेक्षकांशिवाय खेळवण्याची वेळ आयोजकांवर ओढावणार आहे. चाहत्यांच्या गराड्यात खेळणाऱ्या खेळाडूंना या परिस्थितीत मैदानात उतरणे मोठी परीक्षा असेल, असे मत इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट बोर्डने व्यक्त केले आहे.  कोरोनाजन्य परिस्थीतून सावरुन मैदानात उतरण्यासाठी स्टुअर्ट बॉर्ट मानसिक तयारीनिशी उतरणार आहे. यासाठी तो चक्क मानोसपचार तज्ञ डॉक्टरांची मदत घेत आहे. ब्रॉडच्या आईने देखील त्याला यासंदर्भात मोलाचा सल्ला दिला आहे. ब्रॉडने वचुर्अल पत्रकार परिषदेत यासंदर्भातील खुलासा केला.

कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक षटकार लगावणारे खेळाडू माहित आहेत का? 

कोरोनाजन्य परिस्थितीतून सावरत मैदानात उतरणारे सर्व सामने हे पूर्वीप्रमाणे सामान्यच असतील . हे समजावून मैदानात उतरण्यासाठी मानसोपचार तज्ञ डॉक्टरांची मदत घेत आहे. ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरण्यापूर्वी खुद्द आपल्या आईने खास सल्ला दिल्याचेही त्याने सांगितले. मालिकेला निघण्यापूर्वी ब्रॉडने आपली आई मिशेल यांच्याशी चर्चा केली. यावेळी मिशेल यांनी आपल्या मुलाला बालपणाच्या आठवणीत नेले. क्रिकेटच्या मैदानात उतरताना तुला खेळायचे आहे एवढेच लक्षात ठेव असे   त्या म्हणाल्या. यासाठी त्यांनी ब्रॉडला 12 वर्षांच्या क्रिकेट प्रेमी मुलाचे उदाहरण दिले.  एक 12 वर्षीय  मुलगा जो  खेळताना कोणताही विचार करत नाही. त्याला फक्त क्रिकेट खेळायचे असते. तुलाही त्या मुलाप्रमाणेच खेळायचे आहे, असे मिशेल यांनी ब्रॉडला समजावले.  

चेंडूला चमकवण्यासाठी आयसीसीने दुसरा पर्याय देणं गरजेचे : भुवी

इंग्लंडचा संघ कोरोनाजन्य परिस्थितीतून सावरत वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यासोबत घरच्या मैदानावर खेळताना दिसणार आहे. पाहुण्यासंघासमोरच्या मालिका या प्रेक्षकाविना खेळण्यात येणार असल्याचे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 8 जूलैपासून सुरुवात होईल. जगभरात कोरोनाची लाट उसळल्यानंतर मार्चपासून सर्वच खेळ स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. इंग्लंड-वेस्ट इंडिज ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिली स्पर्धा असेल जी कोरोनाजन्य परिस्थितीतून सावरत आयोजित करण्यात आली आहे. विंडीज विरुद्धच्या मालिकेनंत इंग्लंडचा संघ पाकिस्तानसोबतही खेळणार आहे. यासाठी पाकिस्तानचा संघ इंग्लंडमध्ये दाखलही झालाय. 


​ ​

संबंधित बातम्या