World Cup 2019 : सर्वाधिक षटकारांचा विक्रम आता मॉर्गनच्या नावावर

वृत्तसंस्था
Tuesday, 18 June 2019

एकदिवसीय क्रिकेटविश्वातील एक मोठा विक्रम इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने आज (ता.18) आपल्या नावावर केला. आज इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत मॉर्गनने तब्बल 148 धावा फटकावल्या. या फटकेबाजीबरोबर त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.

वर्ल्ड कप 2019 : 
मँचेस्टर :

आतापर्यंत क्रिकेट विश्वामध्ये 17 षटकार कोणत्याही एकदिवसीय सामन्यात पाहायला मिळाले नव्हते. पण आज ही गोष्ट मॉर्गनच्या बॅटमधून पाहायला मिळाली. यापूर्वी 16 षटकारांचा विक्रम विश्वचषकामध्ये ख्रिस गेलच्या नावावर होता. हा विक्रम मॉर्गनने मोडीत काढला आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका सामन्यात मारलेले षटकार
इऑन मॉर्गन-  17 षटकार विरूद्द अफगाणिस्तान
एबी डिव्हीलिअर्स- 16 षटकार विरुद्ध वेस्ट इंडिज
रोहित शर्मा-  16 षटकार विरुद्ध ऑस्ट्रेलिया
ख्रिस गेल- 16 षटकार विरुद्ध झिम्बॉवे

​ ​

संबंधित बातम्या