शारीरिक तंदरुस्तीसाठी मोहम्मद शमीने वापरला 'हा' अनोखा फंडा 

टीम ई-सकाळ
Saturday, 27 June 2020

मागील काही सामन्यांमध्ये  मोहम्मद शमीने उत्तम कामगिरी करत संघाच्या गोलंदाजीची मुख्य धुरा सांभाळली होती. तर वर्ल्ड कप मधील सामन्यात धारदार गोलंदाजी करत हॅटट्रिक करण्याची किमया मोहम्मद शमीने केली होती.

भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा गोलंदाज मोहम्मद शमी कोरोनाच्या लॉकडाउन पूर्वीच आपल्या उत्तर प्रदेशमधील गावी गेला होता. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून मोहम्मद शमी अमरोहा जिल्ह्यातील सहसपूर मधील अलीनगर या गावी वास्तव्यास आहे. या दरम्यान मोहम्मद शमी स्वतःच्या तंदरुस्तीसाठी देखील मेहनत घेत आहे. यापूर्वी शमीने सोशल मीडियावर त्याने तंदरुस्तीसाठी घेत असलेल्या व्हिडिओचे पोस्ट शेअर केले होते. आता असाच काहीसा नवीन व्हिडिओ शमीने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये शमीने आपली चपळता वाढविण्यासाठी एक अनोखा मार्ग वापरून पाहिल्याचे दिसते.      

कोरोनामुळे आता टेनिस जगतातील 'ही' स्पर्धा स्थगित 

त्यामुळे मोहम्मद शमीने आपला फिटनेस कायम ठेवण्यासाठी एक अनोखा फंडा वापरला आहे. मोहम्मद शमीने सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मोहम्मद शमीसह त्याचा पाळीव कुत्रा जॅक देखील उपस्थित आहे. या पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये शमी जॅकबरोबर त्याच्या शेतात झपाट्याने धावताना दिसत आहे. आणि शमी व जॅक यांच्यातील शर्यती दरम्यान जॅक काही काळ मागे राहून, शेवटच्या क्षणात अचानक वेग वाढवून शमीची बरोबरी केली असल्याचे दिसत आहे. जणू जॅक याअगोदर शमीला जिंकण्याची संधी देत ​​असल्याचे चित्र या व्हिडिओमध्ये दिसते.

...म्हणून विराट, रोहित अन् धोनीला अभूतपूर्व यश मिळालं : हार्दिक पांड्या  

मागील काही सामन्यांमध्ये  मोहम्मद शमीने उत्तम कामगिरी करत संघाच्या गोलंदाजीची मुख्य धुरा सांभाळली होती. तर वर्ल्ड कप मधील सामन्यात धारदार गोलंदाजी करत हॅटट्रिक करण्याची किमया मोहम्मद शमीने केली होती. त्यामुळेच क्रिकेटचे सामने पुन्हा सुरु झाल्यावर टीम इंडियाच्या मुख्य गोलंदाजाची भूमिका पार पाडण्यासाठी शमी आपल्या गावातील शेतात तंदरुस्तीसाठी मेहनत घेत आहे. शमीने आत्तापर्यंत ४९ कसोटी सामन्यांमध्ये १८० विकेट्स घेतल्या आहेत. तर ७७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४४ बळी टिपले आहेत.             
 

 


​ ​

संबंधित बातम्या